मुंबई: बुधवारी आयसीसीने ताजी रँकिंग जाहीर केली. यात टी-२० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये भारताचा दबदबा कायम राहिला आहे. टॉप ६मध्ये ३ भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. तिलक वर्माने मोठी झेप घेतली आहे. तो आता तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास वरूण चक्रवर्ती तिसऱ्या आणि रवी बिश्नोई सातव्या स्थानावर कायम आहेत.
तिलक वर्मा तिसऱ्या स्थानावर
आयसीसी टी-२० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर ट्रेविस हेड आहे. त्याचे ८५६ रेटिंग पॉईंट्स आहेत. दुसऱ्या स्थानावर भारताला फलंदाज अभिषेक शर्मा आहे. त्याचे ८२९ पॉईंट्स आहेत. अभिषेक शर्माने या वर्षी इंग्लंडविरुद्ध ५ टी-२० सामने खेळलेत. यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. त्याने आपल्या शेवटच्या टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्ध ५४ बॉलमध्ये १३५ धावांची जबरदस्त खेळी केली.
तिलक वर्माने एका स्थानाने झेप घेतली आहे आणि आता तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तिलकचे ८०४ रेटिंग पॉईंट्स आहेत. तिलक वर्माने यावर्षी ५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने इंग्लंडविरुद्ध एक अर्धशतकही ठोकले.
चौथ्या आणि पाचव्या स्थानावर इंग्लंडचा फलंदाज फिल साल्ट आणि जोस बटलर आहे. सहाव्या स्थानावर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे. त्याने ७३९ पॉईंट्स आहेत. टॉप १० बाबत बोलायचे झाल्यास भारताचे ३ फलंदाज आहेत याशिवाय इंग्लंडचे २ आणि श्रीलंकेचे २ खेळाडू आहेत.
टी-२० गोलंदाजी रँकिंग
सगळ्यात वरच्या स्थानावर वरूण चक्रवर्ती आहे. त्याचे ७०६ पॉईंट्स आहेत. गोलंदाजीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर न्यूझीलंडचा जॅकब डफी आहे. त्याने ७२३ पॉईंट्स आहेत. यात टॉप १०मध्ये ३ भारतीय सामील आहेत. रवी बिश्नोई ६७४ पॉईंट्ससह दुसऱ्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह १०व्या स्थानावर आहे.
हार्दिक पांड्या नंबर १ ऑलराऊंडर
आयसीसी टी-२० ऑलराऊंडर रँकिंगमध्ये हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर आहे. त्याचे २५२ पॉईंट्स आहेत. तर टॉप १०मध्ये तो एकमेव भारतीय आहे. त्यानंतर १२व्या स्थानावर अक्षऱ पटेल आहे.






