सदोष लँडिंग गिअरमुळे झाला विमानाचा अपघात ?

अहमदाबाद : एअर इंडिया कंपनीच्या विमानाला गुरुवार १२ जून २०२५ रोजी अपघात झाला. या अपघाताला सदोष लँडिंग गिअर हे एक कारण असण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. विमानाचा अपघात झाला अथवा वैमानिकाने 'मेडे' असे नियंत्रण कक्षाला कळवले तर संबंधित विमानात काय घडले याची चौकशी केली जाते. या नियमानुसार अपघाताची चौकशी होईल आणि सत्य शोधण्याचा प्रयत्न होईल. पण आतापर्यंत हाती आलेली माहिती आणि व्हायरल झालेले व्हिडीओ बघून तज्ज्ञांनी सदोष लँडिंग गिअरमुळे विमानाचा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

फ्लाइट डेटा रेकॉर्डर, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, ACARS तसेच ब्लॅकबॉक्समधील नोंदी यांच्या मदतीने विमान अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू केले जाते. हे सगळे होईलच. पण व्हायरल झालेले व्हिडीओ आणि हाती आलेली माहिती यानुसार विमान हवेत असताना स्फोट झाला नव्हता. ज्या विमानाला अपघात झाला ते बोईंग कंपनीचे ७८७ - ८ ड्रीमलायनर विमान होते. या विमानात महाशक्तिशाली अशी दोन इंजिन असतात. ही दोन्ही इंजिन ऊर्जेचा पुरवठा खंडीत झाला तर एकदम बंद पडू शकतात. पण हा प्रकार घडण्याची शक्यता अतिशय दुर्मिळ आहे. उड्डाणाच्यावेळी एखादा पक्षी धडकला तर ही समस्या निर्माण होऊ शकते. पण एक पक्षी धडकल्याने एकाचवेळी दोन्ही इंजिन बंद होणे ही बाब अशक्यप्राय वाटते. पण लँडिंग गिअर ही एक बाब अशी आहे ज्याचा गंभीरपणे विचार करायला हवा, असे तज्ज्ञांचे मत आहे.

उड्डाण सुरू होताच लँडिंग गिअर वर केला जातो. पण ज्या विमानाला अपघात झाला त्याचा लँडिंग गिअर खाली होता. तो वर केलेला नव्हता. विमान जमिनीपासून ६०० फूट उंचीवर होते आणि उड्डाण सुरू होते तरी लँडिंग गिअर खाली होता. याचा अर्थ लँडिंग गिअरशी संबंधित तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. उड्डाण होताच काही सेकंदाने वैमानिकाने 'मेडे' असा सिग्नल अर्थात इशारा दिला होता. याचा अर्थ लँडिंग गिअरशी संबंधित समस्येमुळे इंजिन बंद पडत आहे किंवा बंद पडणार आहे याची जाणीव झाली आणि वैमानिकाने तातडीने 'मेडे' असा सिग्नल दिला, असे तज्ज्ञांचे मत आहे.

अपघातापूर्वीच्या घटना एकत्रित करुन त्यांचे विश्लेषण केले जाईल. या विश्लेषणावेळी लँडिंग गिअरच्या मुद्याचा विचार केला जाईलच. पण सध्या उपलब्ध माहिती आणि व्हायरल झालेले व्हिडीओ बघता लँडिंग गिअरमुळे विमानाचा अपघात झाल्याची शक्यता जास्त असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.



'मेडे' म्हणजे काय ?

'मेडे कॉल' हा विमान वाहतूक आणि सागरी वाहतुकीच्या क्षेत्रात सर्वात तातडीचा ​​संकटाचा सिग्नल आहे, जो केवळ जीवघेण्या आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरतात. जिथे तात्काळ मदत आवश्यक असते तिथेच हा शब्द वापरला जातो. विमानाच्या वैमानिकाने / जहाजाच्या खलाश्याने सलग तीन वेळा - "मेडे, मेडे, मेडे" म्हटल्यास सर्वोच्च प्राधान्य देत नियंत्रण कक्षाने तसेच जवळ असलेल्या विमानाने / जहाजाने शक्य ती मदत पुरवणे अपेक्षित आहे. लंडनच्या क्रॉयडन विमानतळावरील रेडिओ अधिकारी फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्ड यांनी "मायडर" या फ्रेंच वाक्यांशाची ध्वन्यात्मक आवृत्ती म्हणून १९२० मध्ये 'मेडे' अर्थात 'मला मदत करा' अशी संज्ञा विकसि केली.
Comments
Add Comment

हिंदूंना एकत्र करून हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी पदयात्रा: धीरेंद्र शास्त्री

आग्रा (उत्तर प्रदेश) : आध्यात्मिक नेते धीरेंद्र शास्त्री यांनी आज सांगितले की, हिंदूंना एकत्र करण्यासाठी, हिंदू

बिहारनंतर आता देशभरात लागू होणार 'SIR': निवडणूक आयोगाची दिल्लीत महत्त्वाची बैठक

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीचा आता संपूर्ण देशभरात एकाच

भारताच्या विरोधात कट? अमेरिकेचे लष्करी विमान थेट पाकिस्तानमध्ये उतरल्याने खळबळ

नवी दिल्ली: भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावपूर्ण असतानाच, अमेरिकन हवाई दलाचे एक मोठे लष्करी विमान थेट

प्रयागराजमध्ये गंगा नदीत तीन किशोरवयीन मुले बुडाली

प्रयागराज : प्रयागराज जिल्ह्यातील पुरामुफ्ती परिसरात आज गंगेत आंघोळीसाठी गेलेली तीन किशोरवयीन मुले बुडाली, असे

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २