
मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वे पंढरपूर येथे होणाऱ्या आपाढी वारीला येणाऱ्या मात्रेकरूंच्या सोय़ीसाठी दिनांक १ ते १० जुलैपर्यंत पंढरपूर आणि मिरजसाठी ८० आषाढी विशेष गाडांच्या सेवा चालवणार आहे. तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी www.enquiry. indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.
सोडण्यात येणाऱ्या गाड्या आणि सेवा
नागपूर-मिरज विशेष गाड्या (४ सेवा) नवीन अमरावती-पंढरपूर विशेष (४ सेवा) खामगाव-पंढरपूर विशेष (४ सेवा) भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष (२ सेवा) लातूर-पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्या (१० सेवा) मिरज-कालबुरगि अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा) कोल्हापूर-कुर्दुवाडी अनारक्षित विशेष गाड्या (२० सेवा) पुणे-मिरज अनारक्षित विशेष गाड्या (१६ सेवा)