
AI 171 विमान उड्डाण करताना कोसळलं
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमादाबा5दमध्ये एअर इंडियाचं AI 171 प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मुंबई : उद्धव सेना ही राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या काही दिवस येत होत्या. या पार्श्वभूमीवर मुंबईत 'ताज लँड्स' ...
विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं म्हंटल जातंय. हे विमान अहमदाबादवरुन लंडनच्या दिशेने जात होतं.
गुजरात के अहमदाबाद में २४२ यात्रियों को लेकर जा रहा एयर इंडिया का विमान दुर्घटनाग्रस्त हो गया है, राज्य पुलिस नियंत्रण कक्ष ने इसकी पुष्टि की है।
अधिक जानकारी की प्रतीक्षा है pic.twitter.com/7awqDgAWq5
— ANI_HindiNews (@AHindinews) June 12, 2025
रहिवासी भागात कोसळलं विमान
अहमदाबाद विमानतळाजवळच हे विमान कोसळलं आहे. ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या भागात रहिवासी वस्ती आहे. जिथे अपघात झाला, त्याच भागात अहमदाबाद येथील शासकीय रुग्णालय आहे. त्यामुळे दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
युद्धपातळीवर बचावकार्य, आग विझविण्याचे प्रयत्न
या भागात अग्निशमन दलाच्या एकूण सात गाड्या दाखल झाल्या आहेत. टेक ऑफच्या अवघ्या १० मिनिटांत हे विमान कोसळल्यानंतर आता काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. विमानाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गांधीनगरहून विमान अपघातस्थळी ९० कर्मचाऱ्यांसह तीन NDRF पथके हलवण्यात आली आहेत. वडोदराहून आणखी तीन पथके हलवण्यात येत आहेत.
विमानात होते १६९ भारतीय
अहमदाबाहून लंडनला जात असलेले एअर इंडियाचे AI 171 हे विमान उड्डाण केल्यानतर थोड्याच वेळात कोसळले. या विमान दोन वैमानिक, दहा क्रू आणि २३० प्रवासी असे एकूण २४२ जण होते. या २४२ पैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, १ कॅनेडियन, ७ पोर्तुगीज नागरिक असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे. एअर इंडियाने प्रवाशांच्या नातलगांच्या सोयीसाठी १८०० ५६९१ ४४४ (1800 5691 444) हा हेल्पलाइन क्रमांक प्रसिद्ध केला आहे.