
अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या बोईंग 787-8 विमानाला मोठा अपघात झाल्यानं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. हे विमान टेकऑफदरम्यान कोसळून थेट बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर आदळलं. त्यावेळी विद्यार्थी मेसमध्ये जेवत असताना हा थरारक क्षण घडला आणि काळाने थेट त्यांच्या दारात हजेरी लावली.
या अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जवळपास २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, विमानातील ११० प्रवासीही मृत्युमुखी पडल्याची भीती आहे. मात्र, अद्याप या आकड्यांची अधिकृत घोषणा झालेली नाही.
अपघाताचा भयावह क्षण…
दुपारी १:३८ वाजता एआय 171 फ्लाइट अहमदाबादहून लंडनकडे रवाना झाली होती. काही वेळातच टेकऑफदरम्यान विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, विमानाच्या मागच्या भागाने झाडाला धडक दिली आणि नंतर ते पेट घेत थेट मेडिकल वसतिगृहावर कोसळलं.

AI 171 विमान उड्डाण करताना कोसळलं अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमादाबा5दमध्ये एअर इंडियाचं AI 171 ...
या इमारतीतच बी.जे. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी राहतात आणि त्यांची मेस देखील तिथेच आहे. जेवणाच्या वेळेसच ही दुर्घटना घडल्याने विद्यार्थ्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याची शक्यता आहे.
विमानातील प्रवाशांची माहिती :
विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यापैकी १२ क्रू मेंबर्स होते. उर्वरित २३० प्रवाशांपैकी १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनडाचा प्रवासी होता.
ब्रिटन सरकारचा मदतीचा हात
ब्रिटिश सरकारने अपघातग्रस्त प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन सुरू केली असून, 1800 5691 444, 011-24610843, आणि 9650391859 या क्रमांकांवर संपर्क करण्याचं आवाहन केलं आहे.