Saturday, August 2, 2025

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद-लंडन AI 171 विमान कोसळलं! प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद-लंडन AI 171 विमान कोसळलं! प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमधून मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमादाबा5दमध्ये एअर इंडियाचं AI 171 प्रवासी विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर काही व्हिडीओ समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये फक्त धुराचे लोट दिसत आहेत. धुराचे लोट पाहून विमानाला मोठा अपघात झाला असावा, असा अंदाज लावला जात आहे. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.


विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे विमान टेक ऑफ करतानाच कोसळलं असल्याचं म्हंटल जातंय. हे विमान अहमदाबादवरुन लंडनच्या दिशेने जात होतं. लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केल्याने त्यामध्ये इंधन देखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





विमानात किती प्रवासी होते?


अहमदाबाद-लंडन हे प्रवासी विमान कोसळले आहे. उड्डाण केल्या केल्या ७ मिनिटांमध्ये हे विमान कोसळले आहे. दरम्यान ३०० प्रवासी क्षमता असलेल्या या विमानातून २४२ प्रवासी प्रवास करतासल्याची माहिती समोर येत आहे.



युद्धपातळीवर बचावकार्य, आग विझविण्याचे प्रयत्न


या भागात अग्निशमन दलाच्या एकूण सात गाड्या दाखल झाल्या आहेत. टेक ऑफच्या अवघ्या १० मिनिटांत हे विमान कोसळल्यानंतर आता काही प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. विमानाला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गांधीनगरहून विमान अपघातस्थळी ९० कर्मचाऱ्यांसह तीन NDRF पथके हलवण्यात आली आहेत. वडोदराहून आणखी तीन पथके हलवण्यात येत आहेत.



कोणत्या एअरलाइनचा समावेश होता?


एअर इंडियाचे हे विमान दुपारी १ वाजून ३१ मिनिटांनी उड्डाण केलेले कोसळले आहे. बीएसएफचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. एनडीएआरइच्या टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Comments
Add Comment