Friday, October 31, 2025
Happy Diwali

POP च्या उंच गणेशमूर्तींबाबत महत्त्वाचे सरकारी निर्देश कधी येणार ?

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती तयार करणे आणि विक्री करण्यावर असलेली बंदी उठवली होती. मात्र, वीस फुटांवरील गणेश मूर्तींबाबत कोणताही निर्णय झाला नाही. उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला भूमिका सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने उंच मूर्तीबाबत धोरण तयार केल्याचे समजते. लवकरच हे धोरण जाहीर केले जाणार असल्याचे वृत्त आहे. राज्यात मागील काही वर्षांपासून पर्यावरणाच्या कारणांमुळे पीओपी मूर्तींवर निर्बंध लादण्यात आले होते. पण लालबागचा राजा, मुंबईचा राजा, गिरगाव, परळ, दादर, चेंबूर व इतर भागांतील मंडळांनी निर्बंधांमध्ये सवलत देण्याची मागणी शासनाकडे केली होती. यावर शासन काय प्रतिसाद देते हे उंच मूर्तींबाबतच्या सरकारी धोरणातून कळेल.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >