मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ जून रोजी काश्मीरसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि ७ जूनपासून ही ट्रेन नियमितपणे सुरू झाली आहे. ही वेगवान वंदे भारत एक्स्प्रेस श्री माता वैष्णो देवी कटरा स्थानकावरून श्रीनगरपर्यंत धावते. या मार्गामध्ये केवळ बनिहाल येथे एकमेव थांबा आहे आणि संपूर्ण प्रवास फक्त ३ तासांत पूर्ण होतो.
शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण पुन्हा पुढे ढकलले, Axiom-4मिशन लाँचिंगची तारीख लवकरच होणार जाहीर
नवी दिल्ली: भारताच्या हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे मिशन Axiom-4 हे पुढे ढकलण्यात आले आहे. काही ...
जर तुम्ही वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन (www.irctc.co.in) एसव्हीडीके ते सिना या स्टेशन कोडनुसार तिकीट बुक करावे लागेल. हे अनुक्रमे कटरा व श्रीनगरसाठीचे कोड आहेत. तुम्हाला तारीख निवडून ट्रेनची यादी पाहायला मिळेल. त्यानंतर AVL (Available) असलेल्या ट्रेनवर क्लिक करून प्रवास तपशील तपासावा. तुमचे नाव, वय, मोबाईल क्रमांक व अन्य आवश्यक माहिती भरून, UPI/कार्डद्वारे पेमेंट करून तिकीट बुक करता येते. पहिली ट्रेन – कटरा येथून सकाळी ८.१० वाजता सुटते आणि ११.१० वाजता श्रीनगर येथे पोहोचते.
जम्मू-काश्मीरमध्ये आता एकूण ४ वंदे भारत ट्रेन
दिल्लीहून कटऱ्यापर्यंत दोन वंदे भारत ट्रेन चालतात. या व्यतिरिक्त, आता कटडा ते श्रीनगरदरम्यानही दोन वंदे भारत ट्रेन उपलब्ध असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये
एकूण चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.
दिल्ली ते कटरा प्रवासाला सुमारे ८ तास आणि कटरा ते श्रीनगर प्रवासाला फक्त ३ तास लागतात. त्यामुळे आता प्रवाशांसाठी जम्मू-काश्मीरचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे.