Friday, October 24, 2025
Happy Diwali

१५ जूनला होणार सूर्याचे राशी परिवर्तन, या राशींना राहावे लागेल सावध

१५ जूनला होणार सूर्याचे राशी परिवर्तन, या राशींना राहावे लागेल सावध
मुंबई: ज्योतिषशास्त्रात सूर्याचे राशी परिवर्तन अतिशय खास मानले जाते. सूर्य सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. यावेळेस सूर्य १५ जूनला मिथुन राशीमध्ये प्रवेश करत आहे. सूर्य मिथुन राशीत सर्वात मजबूत मानला जात आहे. सूर्य मिथुन राशीमध्ये १५ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्य व्यक्तीची प्रतिष्ठा, आत्मसन्मान आणि अहंकराचे प्रतिनिधित्व करतो. जाणून घेऊया सूर्याचे राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना सावध रहावे लागणार आहे.

मेष

सूर्याचे गोचर मेष राशीवाल्यांसाठी प्रतिकूल ठरणार आहे. महत्त्वाची कामे थांबू शकतात. शिक्षण आणि प्रतियोगितेच्या प्रकरणांमध्ये सावधानता बाळगा

वृषभ

आरोग्याची काळजी घ्या. वादांपासून दूर राहा. कुटुंबात थोडे वाद होऊ शकतात. नोकरीपेशा जीवनात समस्या येऊ शकतात.

सिंह

हे गोचर सिंह राशीच्या लोकांमध्ये अहंकार निर्माण होऊ शकतो. दाम्पत्य जीवनात थोडेफार वाद होऊ शकतात. बिझनेसमध्ये नुकसान सहन करावे लागू शकते.

धनू

सूर्य गोचरमुळे धनू राशीच्या लोकांना मिळतेजुळते परिणाम मिळतील. कुटुंबामध्ये थोडेफार त्रास होऊ शकतात. जीवनात चढ-उताराचा सामना करावा लागू शकतो.

मकर

आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. रागापासून दूर राहा. आरोग्याची खास काळजी घ्यावी लागेल. आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.  
Comments
Add Comment