Strawberry Moon: आज रात्री आकाशात पाहायला विसरू नका... गुलाबी रहस्यमयी चंद्र

  70

१८.६ वर्षांनी एकदाच दिसतो गुलाबी चंद्र


मुंबई: जून महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री ७ नंतर आकाशात चंद्राचे आगळे वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज दिनांक ११ जूनच्या रात्री आकाशात पाहायला विसरू नका. हा एक दुर्मिळ क्षण असून खगोल निरीक्षकांसाठी आणि आकाशप्रेमींसाठी हा खूप खास दिवस असणार आहे.  कित्येक वर्षांनी दिसणारा स्ट्रॉबेरी मून (Strawberry Moon) आज पुन्हा एकदा भारतासह जगाच्या सर्व भागात दिसणार आहे.



चंद्रप्रकाश दुर्मिळ असेल


आज रात्री आकाशात पूर्णं चंद्र तर दिसेल, पण तो गुलाबी छटेचा दिसणार आहे. त्यामुळे त्याला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे देखील म्हंटले जात आहे. स्ट्रॉबेरी मून हा बदलत्या ऋतूंची आणि प्राचीन परंपरांची आठवण करून देणारा आहे, नासाने म्हटले आहे की चंद्र सध्या पृथ्वीपासून त्याच्या सर्वात दूरच्या बिंदूजवळ असल्याने, तो "स्ट्रॉबेरी मायक्रो मून" म्हणून दिसेल. ही परिस्थिती दर १८.६ वर्षांनी एकदाच येते. त्यामुळे आजचा चंद्रप्रकाश दुर्मिळ ठरणार आहे. या आधी असा चंद्र २००५ मध्ये दिसला होता, त्यानंतर गुलाबी चंद्र पाहण्याची संधी २०४३ मध्ये मिळेल. यावर्षी चंद्र पृथ्वीपासून सर्वात दूर अंतरावर असेल, त्यामुळे तो नेहमीपेक्षा थोडा लहान आणि कमी दिसणार आहे .



‘स्ट्रॉबेरी मून’ नावामागची रंजक कहाणी


गुलाबी छटा दिसणाऱ्या चंद्राला ‘स्ट्रॉबेरी मून’ असे का म्हंटले जाते याचे कारण देखील खास आहे. "स्ट्रॉबेरी मून" हा शब्द उत्तर अमेरिकेतील अल्गोनक्विन जमातींकडून आला आहे.  या काळात स्ट्रॉबेरी फळांची कापणी होत असल्यामुळे या चंद्राला ‘स्ट्रॉबेरी मून’  असे नाव देण्यात आले .


काही अमेरिकन जमाती त्याला बेरीज रिपन मून, ग्रीन कॉर्न मून, ब्लूमिंग मून आणि हॉट मून असेही म्हणतात. ज्यांना आश्चर्य वाटते त्यांच्यासाठी, काही इंग्रजी नावांमध्ये फ्लॉवर मून, प्लांटिंग मून आणि मीड मून यांचा समावेश आहे, तर सेल्टिक लोकांनी त्याला हॉर्स मून, डायन मून आणि रोझ मून असे नाव दिले आहे.

‘स्ट्रॉबेरी मून’ कुठे आणि कसे पाहता येईल?


 जर तुम्ही भारतात राहत असाल, तर ही घटना पाहण्याचा सर्वोत्तम वेळ सूर्यास्तानंतर संध्याकाळी ७:१५ ते रात्री ८:०० च्या दरम्यान असेल. सर्वोत्तम दृश्य अशा ठिकाणाहून असेल जिथे प्रकाश प्रदूषण कमी असेल आणि आकाश निरभ्र असेल.  विशेष म्हणजे हा चंद्र पाहण्यासाठी कुठल्याही साधनाची गरज नाही, उघड्या डोळ्यांनी किंवा दुर्बिणीतून याचा अनुभव घेता येणार आहे.


 

 
Comments
Add Comment

Air Indiaकडून प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी विशेष मदत उड्डाणांची व्यवस्था

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये Air India च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर, Air India ने प्रवाशांचे नातेवाईक आणि

अहमदाबाद : शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ अहमदाबाद : गुजरातच्या अहमादाबाद येथे आज, गुरुवारी एअर इंडियाचे विमान

Ahmedabad plane crash: माजी मुख्यमंत्री विजय रूपाणीसह २४२ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील सात प्रवाशांचा समावेश

हॉस्टेल इमारतीवर विमान आदळल्याने विद्यार्थीसह अनेक जखमी अहमदाबाद : गुजरातमध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाचे AI

आजच्याच दिवशी ७५ वर्षांपूर्वी झाला होता मोठा विमान अपघात, समुद्रात पडले होते विमान

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद एअरपोर्टजवळ विमान अपघाताच्या ठिकाणी धुराचे लोळ आणि अपघाताची दृश्ये ही हृदय हेलावून

सदोष लँडिंग गिअरमुळे झाला विमानाचा अपघात ?

अहमदाबाद : एअर इंडिया कंपनीच्या विमानाला गुरुवार १२ जून २०२५ रोजी अपघात झाला. या अपघाताला सदोष लँडिंग गिअर हे एक

चमत्कार, Air India अपघातातून सीट 11A वरील प्रवासी वाचला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी Air India च्या बोईंग 787-8 Dreamliner विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात बहुतांश