Thursday, June 12, 2025

Stock Market News: शेअर बाजार सुरूवात उसळीने सेन्सेक्स १३६.४२ अंशाने तर निफ्टी ४५.६५ अंशाने वधारला

Stock Market News: शेअर बाजार सुरूवात उसळीने सेन्सेक्स १३६.४२ अंशाने तर निफ्टी ४५.६५ अंशाने वधारला

प्रतिनिधी: आज सकाळी गिफ्ट निफ्टी निर्देशांकात वाढ झाली आहे. गिफ्ट निफ्टीत सकाळी ०.१५ % वाढ झाली होती. सेन्सेक्स (Sensex) १३६.४२ अंशाने वाढ होत निर्देशांक ८२५२६.४९ पातळीवर पोहोचले आहेत.तर निफ्टी ५० (Nifty 50) निर्देशांक ४५.६५ अंशाने वाढत २५१४९.९० पातळीवर पोहोचला आहे.मुख्यत:शेअर बाजारातील चांगल्या परिस्थितीमुळे शेअर बाजारात औत्सुक्याचे वातावरण आहे.जागतिक संकेत संमिश्र असले तरी अमेरिकेन बाजारात महागाईचे आकडे आज येणार आहे तसेच भारतातही ते उद्या येऊ शकतात.चीन-अमेरिका व्यापार संबंधातही सकारात्मकतेचे संकेत मिळाले असले तरी अजून यावर कोणतेही स्पष्टीकरण किंवा अंतिम निष्कर्ष मिळालेले नाहीत.त्यामुळे याविषयी संदिग्धता आहे.मात्र काल घरगुती व परदेशी गुंतवणूकदारांच्या रोख खरेदी वाढल्याने बाजारात चांगले वातावरण कायम आहे.सकाळी प्री-ओपन सत्रातच बाजारात ०.१० % वाढ झाली होती.


सेन्सेक्स बँक निर्देशांकात २२.९८ अंशाने वाढत निर्देशांक ६३९३२.७२ पातळीवर तर बँक निफ्टी निर्देशांकात ५४.१० अंशाने घसरण होत निर्देशांक ५६५७५.०० पातळीवर पोहोचला आहे.सेन्सेक्स मिडकॅप ०.४५% व निफ्टी मिडकॅपमध्ये ०.४५% वाढ झाली आहे. सेन्सेक्स स्मॉलकॅपमध्ये ०.४७% व निफ्टी स्मॉलकॅपमध्ये ०.११% वाढ झाली आहे.आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांक (Nifty Sectoral Indices) मध्ये सर्वाधिक वाढ तेल व गॅस (१.७५%) समभागात झाली आहे.याशिवाय रिअल्टी (०.८०%),ऑटो (०.९४%) समभागात झाली आहे तर सर्वाधिक घसरण मिडस्मॉलकॅप फायनांशियल (०.२९%),कंज्युमर ड्युरेबल्स (०.१७%) समभागात झाली आहे.


मंगळवारी,भारतीय बाजार एकप्रकारे स्थिर राहिले होते.वित्तीय क्षेत्रातील नफा बुकिंगमुळे (Profit Booking) चार दिवसांची तेजी थांबली होती.तथापि मजबूत परकीय पोर्टफोलिओवर २,३०२ कोटींची गुंतवणूक आणि सतत देशांतर्गत खरेदीमुळे भावनांना पाठिंबा मिळाला.क्षेत्रीयदृष्ट्या,आयटीने मजबूत अमेरिकन डेटापेक्षा चांगली कामगिरी केली होती.


सकाळच्या सत्रात शेअर बाजारात टाटा टेलिकॉम (१२.०२%),सम्मान कॅपिटल (४.६%),अलोक इंडस्ट्रीज (४.५१%),स्टर्लिंग अँड विल्सन (४.४१%),इंटलेक डिझाईन (४.०२%),भारत पेट्रोलियम (३.६२%),कोल इंडिया (२.४२%),हिरो मोटोकॉर्प (२.००%),टीव्हीएस (१.९७%),महिंद्रा अँड महिंद्रा (१.७७%),रिलायन्स (१.४९%) या समभागात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण युनायटेड स्पिरीट (६.५२%) गोदरेज इंडस्ट्रीज (२.५५%), गार्डन रिच (२.५१%),कोचीन शिपयार्ड (२.४२%),टाटा इनव्हेसमेंट कॉर्पोरेशन (२.१४%),स्विगी (१.६६%),श्रीराम फायनान्स (०.९१%),अदानी पोर्टस (०.४९%),एचडीएफसी बँक (०.४२%) समभागात झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा