वन्यप्राण्यांना दत्तक घेण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची योजना

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील प्राण्यांचे पालकत्व घेता येणार असून त्याबाबत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने घोषणा केली आहे. वर्षभर वाघ, सिंहाचे पालकत्व घेण्यासाठी प्रत्येकी साधारण तीन लाख रुपये, तर बिबट्यासाठी दीड लाख रुपये मोजावे लागणार आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातर्फे वन्यप्राणी दत्तक योजना राबविण्यात येते. या योजनेनुसार वाघ ३ लाख १० हजार रुपये, सिंह ३ लाख रुपये, बिबट्या १ लाख २० हजार रुपये, वाघाटी ५० हजार रुपये, नीलगाय ३० हजार रुपये आणि हरिण २० हजार रुपये भरून वर्षभरासाठी दत्तक घेता येणार आहे.


यापूर्वी मंत्री रामदास आठवले यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्या दत्तक घेतला होता. तसेच सामाजिक कार्यकर्त्या साधना वझे या अनेक वर्षे बिबट्याला दत्तक घेत आहेत. याचबोरबर प्रताप सरनाईक, अभिनेता समुमित राघवन यांनीही प्राणी दत्तक घेतले आहेत. तसेच दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनीही २०२१ पासून विविध वन्य प्राणी दत्तक घेतले होते.


वन्य प्राण्यांचा आहार, उपचारांवरील खर्च, तसेच मानवी साखळीत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या वन्य प्राण्याविषयी शहरवासीयांची जवळीक वाढावी या उद्देशाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वन्यप्राणी दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. वन्यप्राणी दत्तक योजनेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यप्राण्यांच्या प्रजाती एक वर्षांच्या करारावर दत्तक घेता येतात. वर्षभर प्राण्यांचा आहार व उपचाराचा खर्च संबंधिताला दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला करावा लागतो.


केवळ आर्थिक मदतीपुरती ही योजना मर्यादित नाही. यामुळे वन्यजीवांविषयी सामान्य नागरिकांना प्रेम, आपुलकी वाटावी हा या योजनेमागे उद्देश आहे. तसेच एखादा वन्यप्राणी दत्तक घेतल्यास त्या व्यक्तीला त्याचे पालकत्व स्वीकारल्याचे प्रमाणपत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून देण्यात येते. दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा फलक त्या प्राण्याच्या पिंजऱ्यजवळा लावण्यात येतो. तसेच आठवड्यातून एकदा कुटुंबासह त्या प्राण्याची नि:शुल्क पाहणी करता येते. या योजनेअंतर्गत सिंह, वाघ, वाघाटी, बिबट्या, नीलगाय आणि हरिण या वन्यजीवांना दत्तक घेता येते.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी