लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवार ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final सुरू झाली. नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज अवघ्या ६७ धावांत परतले. उस्मान ख्वाजा शून्य धावा करुन रबाडाच्या चेंडूवर बेडिंगहॅमकडे झेल देऊन परतला. मार्नस लाबुशेन १७ धावा करुन मार्को जॅनसेनच्या चेंडूवर व्हेरेनकडे झेल देऊन परतला. कॅमेरॉन ग्रीन चार धावा करुन रबाडाच्या चेंडूवर मार्करामकडे झेल देऊन परतला. ट्रॅव्हिस हेड ११ धावा करुन मार्को जॅनसेनच्या चेंडूवर व्हेरेनकडे झेल देऊन परतला. ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज लवकर बाद झाले. पण चर्चा सुरू आहे ती ट्रॅव्हिस हेड कसा झेलबाद झाला याचीच.
मार्को जॅनसेनने टाकलेला चेंडू वाईड जात आहे असे वाटत होते. पण अखेरच्या क्षणी ट्रॅव्हिस हेडने चेंडू फटकावला. ही ट्रॅव्हिस हेडने केलेली मोठी चूक होती. कारण ट्रॅव्हिस हेडने फटकावलेला चेंडू व्हेरेनने झेलला. व्हेरेनने एक सुंदर झेल घेतला. या झेलचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.