Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

इंदोर : सोनमच्या भावाने घेतली राजाच्या आईची भेट

इंदोर : सोनमच्या भावाने घेतली राजाच्या आईची भेट

बहिणीच्या कृत्याबद्दल मागितली माफी

इंदोर : इंदोरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशी हिचा भाऊ गोविंद याने आज, बुधवारी इंदोरला जाऊन मृत जावयाच्या कुटुंबियांची भेट घेतली. आपली बहिणच मारेकरी असून तिच्या कृत्याबद्दल गोविंदने माफी मागितली. तसेच सोनमला फाशी व्हावी यासाठी लढू असे देखील त्याने सांगितले.

गोविंदने दिवंगत राजाची आई उमा देवीं यांना सांगितले की तो गाझीपूर (उत्तर प्रदेश) मध्ये सोनमला फक्त 2 मिनिटे भेटू शकला कारण पोलिस त्यांना भेटू देत नव्हते. दरम्यान, गोविंदने त्याची बहीण सोनमला विचारले, "तू या हत्येत सहभागी आहेस का?" सुरुवातीला सोनमने ते नाकारले, पण जेव्हा गोविंदने तिला सांगितले की आकाश राजपूत, विशाल उर्फ ​​विकी ठाकूर आणि आनंद कुर्मी आणि राज कुशवाह या 3 कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी गुन्हा कबूल केला आहे, तेव्हा सोनमने आपली नजर खाली केली. ती गोविंदच्या डोळ्यात पाहू शकली नाही. सोनमला लहानपणापासून पाहत आलो असल्याने मला जाणवले की तो हत्येत सामील आहे. संतप्त झालेल्या गोविंदने सोनमला झापड मारण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला रोखले.

उमा देवी यांनी माध्यमांना सांगितले की, गोविंद त्याच्या बहिणीच्या कृत्याबद्दल खूप खजिल आणि संतप्त आहे. त्याने सांगितले की सोनमला शिक्षा व्हावी यासाठी तो आमच्यासोबत आहे." गोविंद मंगळवारी इंदूरला पोहोचला आणि थेट त्यांच्या घरी आला. आम्ही गोविंदला माफ केले कारण त्याला कटाची माहिती नव्हती. आता आपण सर्व मिळून सोनम आणि इतर खुन्यांना शिक्षा मिळवून देऊ असे आश्वासन गोविंदने राजाच्या कुटुंबियांना दिले.

मेघालय पोलिसांच्या 'ऑपरेशन हनिमून'मधून उघड झाले की सोनमने 23 मे रोजी शिलाँगमधील सोहरा येथे राजाला मारण्याचा कट रचला होता. तिचा प्रियकर राज कुशवाह आणि तीन मारेकऱ्यांसह तिने राजाला एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्याची हत्या केली. पोलिसांना 42 सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच रक्ताने माखलेले जॅकेट आणि सोनमचा रेनकोट असे पुरावे सापडले. सोनमने 9 जून रोजी गाजीपूरमध्ये आत्मसमर्पण केले होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >