Friday, October 24, 2025
Happy Diwali

Solapur News : थेट पोटावर वार! वेटरला शिवीगाळ केली अन्...

Solapur News : थेट पोटावर वार! वेटरला शिवीगाळ केली अन्...

सोलापूर : पत्रा तालिम येथील संदीप लक्ष्मण पाटील उर्फ भैय्या पाटील याच्यावर त्याच्याच ओळखीच्या तरूणाने आज सकाळी ९.३०च्या सुमारास चाकूने पोटात वार केले आहेत. विनायक बोगा असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. बार्शी रोडवरील भोगाव हद्दीत हा प्रकार घडला आहे. हॉटेलवरील वेटरला शिवीगाळ केल्याच्या कारणातून हे भांडण झाल्याचे सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले.

सकाळी ९.३० सुमारास भैय्या पाटील हा भोगाव हद्दीतील हॉटेल सुखसागरजवळ थांबला होता. त्यावेळी झालेल्या वादातून विनायक बोगा याने भैय्या पाटील याच्यावर चाकूने वार केले. त्यात भैय्या पाटलाच्या पोटावर वार झाले असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, भैय्या पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला तडीपार देखील केले होते. सोलापूर तालुका पोलिस अधिक तपास करीत आहेत. या भांडणात विनायक बोगा देखील जखमी असून त्याच्यावरही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघेही फार गंभीर जखमी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलिस म्हणाले. अजून कोणीही पोलिसांत फिर्याद दिलेली नाही, असेही सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >