आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताच न्यूयॉर्क मेजर लीगमध्ये झाला कॅप्टन

न्यूयॉर्क : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्याने निवृत्ती जाहीर करुन एक दिवस उटलत नाही तोच मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.


वेस्ट इंडिजचा २९ वर्षीय स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी अचानक निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर निकोलस पूरनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत पोस्ट केलीय. वेस्ट इंडिजकडून त्याने १६० पेक्षा जास्त मर्यादीत षटकांचे सामने खेळले होते. त्याने ६१ ट्वेंटी-२० आणि १०६ वन डे सामन्यांत चार हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आता त्याच्या खांद्यावर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.



इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत त्यानं विश्रांतीची मागणी केली होती. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत होता. आयपीएल २०२५ मध्ये त्यानं १४ सामन्यात २०० च्या स्ट्राइक रेटनं ५२४ धावा केल्या होत्या. पण, त्यांचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरला नाही.
आता निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीच्या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.


निकोलस पूरन मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क (MI New York) संघाचे कर्णधारपद भूषविणार आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने आगामी मेजर क्रिकेट लीग २०२५ साठी पूरनची कर्णधार म्हणून नेमणूक केली आहे,अशी घोषणा MI च्या व्यवस्थापनाने बुधवारी केली.


मुंबई इंडियन्स न्यू यॉर्क संघाचे मेजर क्रिकेट लीग २०२५ मधील साखळी सामने (भारतीय वेळेनुसार)


१४ जून - MI न्यू यॉर्क वि. टेक्सास सुपर किंग्स - पहाटे ६.३० वा.


१६ जून - सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स वि. MI न्यू यॉर्क -पहाटे ६.३० वा.


१९ जून - MI न्यू यॉर्क वि. सीटल ऑर्कास पहाटे ६.३० वा.


२२ जून - MI न्यू यॉर्क वि. वॉशिंग्टन फ्रीडम वा. पहाटे ५.३०


२४ जून - MI न्यू यॉर्क वि. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नस-पहाटे ५.३० वा.


२८ जून - MI न्यू यॉर्क वि. सीटल ऑर्कास पहाटे ५.३० वा.


३० जून - टेक्सास सुपर किंग्स वि. MI न्यू यॉर्क - पहाटे ५.३० वा.


४ जुलै - लॉस अँजेलेस नाइट रायडर्स वि. MI न्यू यॉर्क-पहाटे ४.३० वा.


६ जुलै - लॉस अँजेलेस नाइट रायडर्स वि. MI न्यू यॉर्क, मध्यरात्री १२.३० वा.


७ जुलै - MI न्यू यॉर्क वि. वॉशिंग्टन फ्रीडम, मध्यरात्री १२.३० वा.




Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियन ओपन : सबालेन्काने गाठली अंतिम फेरी

मेलबर्न  :जागतिक क्रमवारीत नंबर १ टेनिसपटू अरिना सबालेन्का हिने ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या

P. T. Usha: धावपटू पी.टी. उषा यांच्या पतीचे निधन; पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

प्रसिद्ध धावपटू पी. टी. उषा यांच्या पतीचे निधन झाले आहे. पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांनी वयाच्या ६७ व्या

संजू सॅमसनऐवजी इशानला संधी?

टी-२० वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारताची तगडी सेना मुंबई  : येत्या ७ फेब्रुवारीपासून मायदेशात सुरू होणाऱ्या टी-२०

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद