Sunday, October 26, 2025
Happy Diwali

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील WTC फायनल अनिर्णित राहिली तर ?

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील WTC फायनल अनिर्णित राहिली तर ?
लॉर्ड्स : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ११ जून २०२५ पासून लॉर्ड्स येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अर्थात WTC Final होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकणार आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया आणि टेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरणार आहे. कॅमेरॉन ग्रीन ऑस्ट्रेलियाकडून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुखापतीतून सावरलेल्या ग्रीनला खेळवण्यासाठी संघातून लॅबुशेनला वगळायचे की अन्य एखाद्या पर्यायाचा विचार करायचा हे ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने अद्याप ठरवलेले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ऑस्ट्रेलियाच्या कसलेल्या खेळाडूंचा सामना करायचा आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या पुरुष संघाने आयसीसीची एक स्पर्धा गमावली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने आयसीसीच्या दोन संघांमध्ये पराभवाचा सामना केला आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका संघ दबावात आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी एका राखीव दिवसाची तरतूद आहे. यामुळे पाऊस पडला आणि काही तास वाया गेले तर सामना सहाव्या दिवसापर्यंत खेळवला जाऊ शकतो. हा कसोटी सामना कोणत्याही कारणाने अनिर्णित राहिला तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा संयुक्तपणे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना दिली जाणार आहे.
Comments
Add Comment