आयपीएल नावाची दंतकथा वास्तवात उतरलेली...

  83

उमेश कुलकर्णी


आयपीएल या नावाने क्रिकेटचा महासंग्राम २००८ साली सुरू झाला. त्यावेळी केवळ आठ संघ होते. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे. कसोटी क्रिकेट कंटाळवाणे होऊ लागले म्हणून एकदिवसीय मर्यादित क्रिकेटचे सामने सुरू झाले. तेही कंटाळवाणे होऊ लागले तेव्हा बीसीसीआयच्या सुपीक डोक्यातून आयपीएल ही क्रिकटची महास्पर्धा सुरू करण्याचा बेत शिजला. त्याचे जनक होते ललित मोदी. हा सारा इतिहास सर्वाना ठाऊक आहे. पण आयपीएलचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आयपीएल सामने कधीही कंटाळवाणे होत नाहीत. त्यात प्रेक्षकांना कंटाळा न आणणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. जसे की चिअरलीडर्स, खेळाच्या नियमात बदल केले गेले आणि आता तर डीआरएसच्या नियमातही बदल करण्यात आले आहेत.


सर्वांचा उद्देश एकच आहे तो म्हणजे आयपीएल सामने कधीही कंटाळवाणे होऊ नयेत. या उद्देशाला बीसीसीआय पुरेपूर उतरली आहे असे म्हणावे लागेल. यंदा तर खेळाडूंना सलायव्हा लावण्याची परवानगी देण्यात आली होती. कारण गेली दोन वर्षे कोविडमुळे सलायव्हा लावण्यास बंदी होती. आता तीही पुरी करण्यात आली. इंग्लंडचा माजी ग्रेट क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन हा तर आयपीएलला मनोरंजनाचा कार्यक्रम मानत असे. हे क्रिकेट नाहीच असे त्याचे म्हणणे होते. पण कॉम्पटनचे काहीही म्हणणे असो, आज आयपीएल आपल्या उद्देशात सफल झाले आहे. तीन तास लोक टीव्हीला खिळून राहतात आणि तेही सायंकाळचे तीन तास त्यामुळे लोकांना दिवसभराची कामे करून आयपीएलची मजा लुटता येते. हा एक मोठा फायदा आहे.


आयपीएलमुळे भारताला चांगले खेळाडू मिळाले हे नाकारता येणार नाही. आयपीएलमुळेच वैभव सूर्यवंशी सारखा १३ वर्षांचा स्टार मिळाला किंवा आयपीएलमुळेच साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांच्यासारखे गुणवान क्रिकेटपटू मिळाले हे नाकारता येणार नाही. आयपीएलच्या काही मायनस पॉइंटही आहेत. त्यात आहे अर्थातच गोलंदाजाची कबर खणली जाते. संपूर्ण आयपीएल स्पर्धेचा फॉरमॅट असा आहे की, त्यात गोलंदाजांना काही वावच राहू नये. त्यामुळे सारे काही फलंदाजांसाठी चालले आहे असे वाटते. पण त्यातही काही सकारात्मक बाजू आहेत. जसे की फलंदाजाच्या बॅट तपासून घेतल्या जातात आणि त्यांची रूंदी नियमाप्रमाणे जास्त नाही ना हे तपासण्याची पंचांना मुभा असते.


यंदाच्या आयपीएलमध्ये तर फलंदाजांनीच आपली बॅट तपासून घेतल्याचे आपण पाहिले. यंदाच्या आयपीएलने आपल्याला कोणते नवीन क्रिकेटपटू आणि स्टार दिले याचा विचार केला तर पहिल्यांदा नाव येते ते १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशीचे. त्याचा जन्म बिहारमधील समस्तीपूरचा. त्याने बिहारचे नाव दिगंतात झळकवले ते आपल्या गुजरात टायटन्सविरुद्ध शतकी खेळी करून आणि समोर गोलंदाज होते ते गुजरातचे तुफान वेग असणारे. वैभवने गुजरातविरुद्ध तुफानी १०१ धावा केल्या आणि त्याची शतकी भागीदारी प्रचंड गाजली. वैभवने वयाच्या १३व्या वर्षी हा चमत्कार केला तर चेन्नईच्या आयुष म्हात्रेने अवघ्या सतराव्या वर्षी जोरदार धावा करून आपल्या आगमनाची ग्वाही दिली.


त्याने शतकी खेळी वगैरे केली नाही पण त्याची गुणवत्ता कोणत्याही मोठ्या क्रिकेटपटूइतकीच महान होती. गुजरातचा साई सुदर्शन असाच एक लक्षवेधी खेळाडू ठरला. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये तब्बल ७५९ धावा केल्या, त्याचे वय आहे अवघे २३ वर्षे. त्याने ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. तर अनेक विक्रम यंदाच्या आयपीएलमध्येही झाले. हैदराबादचा अभिषेक शर्माने एकाच सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम यंदा केला. त्याने पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना ५५ चेंडूंत १४१ धावांची तुफानी खेळी केली. हा विक्रम आहे. पण असे अनेक विक्रम आहेत जे की इतिहासात नोंदवले जातील.


यंदाच्या आयपीएलचे वैशिष्ट्य हे आहे की, लक्ष्याचा तोही कल्पनातीत अशा लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करण्यात आला आणि तोही मुंबईसारख्या संघाच्या लक्ष्याचा. मुंबई इंडियन्स दर्जेदार गोलंदाजांची खाण म्हणून मानला जातो. पण त्या संघाला नेस्तनाबूत करणारे फलंदाज यंदाच्या आयपीएलमध्ये सापडले. यंदाच्या आयपीएलने नवीन विजेता संघ दिला तो म्हणजे आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगलूरु. पण त्यांचा कर्णधार रजत पाटीदार आणि विराट कोहली हे साऱ्या खेळाचे स्टार होते. तसेच त्यांचा गोलंदाज कृणाल पांड्या. हार्दिक पांड्याचा हा मोठा भाऊ. पण कृणाल पांड्याने यंदाच्या बंगलूरुकडून खेळताना आयपीएल गाजवली.


पाच वेळेची विजेती राहिलेली चेन्नईची सुपर किंग्ज यंदा मात्र तळाच्या स्थानावर राहिली. त्याबाबत अनेक प्रकारे बोलले गेले. पण वस्तुस्थिती आहे ती आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद हा संघ खालच्या स्थानावर राहिला. राजस्थानचा रॉयल्स संघही त्याच्या मागेच आहे. पण त्या संघात काही खरोखरच दर्जेदार खेळाडू होते. पण त्यांचे काहीच झाले नाही. अखेर संघ बाराच्या भावात गेला तो गेलाच. दिल्लीच्या संघाचीही तीच गत झाली. के. एल. राहुल आणि कंपनीसारखे वरिष्ठ खेळाडू असतानाही संघ काही करामत करू शकला नाही.


पण गुजरात अखेरपर्यंत टॉप राहिला आणि शेवटच्या क्षणी त्याने माती खाल्ली, तीही मुंबईसमोर. पण पंजाब आणि बंगळूरु हे संघ शेवटपर्यंत राहिले आणि अखेरच्या क्षणी पंजाबचा शशांक सिंगने अखेरच्या ६१ धावा केल्या पण त्या अपुऱ्या ठरल्या आणि पंजाबचा संघ बंगलूरुने दिलेले लक्ष्य साध्य करू शकला नाही. आयपीएलचे एक महापर्व संपले. या महापर्वाची अखेर मात्र शोकांतिका झाली. त्याला कोण जबाबदार आहेत त्याची चौकशी होईल. रीतसर बंगलूरुच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अचानक आनंदाच्या सोहळ्याचे रूपांतर शोकपर्वात झाले. चेंगराचेंगरी होऊन अनेकांचा जीव गेला. कित्येकांची स्वप्ने तशीच राहिली. पण यंदाच्या आयपीएलची ही एक दुखरी बाजू सोडली तर आयपीएल हा एक आनंदसोहळा ठरला.

Comments
Add Comment

खड्ड्यांच्या शापातून रस्त्यांना मुक्ती कधी?

कोणत्याही कामाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर त्याची दुरवस्था होत नाही. विशेषत: राज्यातील रस्त्यांच्या

धार्मिक, ऐतिहासिक वारसा लाभलेले पालघर

कोकणच्या उत्तर भागात पूर्वेकडे सह्याद्री पर्वतरांगा, पश्चिमेकडे अरबी समुद्रा दरम्यान पसरलेला आहे. पालघर

ओझोनमुळे कोंडला महानगरांचा श्वास

उन्हाळ्यात प्रमुख महानगरांमध्ये जमिनीजवळील ओझोन प्रदूषण लक्षणीयरीत्या वाढले. गेल्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या

दुसरं लग्न करताय? सावध राहा!!

मीनाक्षी जगदाळे आपल्या समाजरचनेत दिवसेंदिवस जे चुकीचे बदल घडत आहेत, विवाहबाह्य संबंध, त्यातून गुन्हेगारीचा उदय

मग बॉम्बस्फोट केले कोणी?

शंतनु चिंचाळकर दहशतवाद्यांनी मुंबईची लाईफलाईन असलेल्या सात लोकल ट्रेनमध्ये प्रेशर कुकरच्या साह्याने

आजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्या!

सध्याच्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी आजी विद्यार्थ्यांपेक्षा माजी विद्यार्थ्यांचे फार लाड केले जातात. माजी