रस्‍त्‍याची चाळण झाल्‍याचे दिसल्‍यास कडक कारवाई होणार, बीएमसी आयुक्तांचा इशारा

  77

मुंबई : महानगरपालिकेने रस्‍त्‍यांवरील खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा आमंत्रित करून कंत्राटदार नियुक्त केले आहेत. त्‍याच्‍या प्रत्‍यक्ष कामकाजास सुरूवात झाली आहे. सर्व २२७ निवडणूक प्रभागातील नियुक्‍त दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या क्षेत्रात दररोज दौरा करावा. स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे (Proactively) खड्डे शोधावेत. खड्डे छोट्या आकारांचे असतानाच ते भरावेत, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत. मुंबईकर नागरिकांना रस्ते प्रवासादरम्यान कोणत्याही गैरसोयींना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून कार्यवाही करावी. रस्‍त्‍याची चाळण झाल्‍याचे निदर्शनास आल्‍यास कडक कारवाई केली जाईल, असा सक्‍त इशारादेखील गगराणी यांनी दिला आहे.


पावसाळ्याच्‍या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी रस्‍ते व वाहतूक विभागाच्‍या अभियंत्‍यांची आज (दिनांक ९ जून २०२५) बैठक घेतली, त्‍यावेळी त्‍यांनी हे निर्देश दिले. महानगरपालिका मुख्‍यालयात झालेल्‍या या बैठकीस अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर, उपायुक्‍त (पायाभूत सुविधा) शशांक भोरे, प्रमुख अभियंता (रस्‍ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्‍यासह उपप्रमुख अभियंता, कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता आदी उपस्थित होते.


महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी म्‍हणाले की, जोरदार व सततच्‍या पावसाने रस्‍त्‍यांवर होणारे खड्डे भरण्‍याकामी कंत्राटदार नियुक्‍तीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित कंत्राटदारांकडून रस्त्यावरील खड्डे तातडीने भरले जातील, यासाठी दुय्यम अभियंत्‍यांनी सजग राहिले पाहिजे. रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी / खड्डे मुक्त रस्ते असावेत यासाठी, मुंबई महानगरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे प्रतिवर्षी खड्ड्यांची संख्या आणि समस्या हळूहळू कमी होत आहे. भविष्यात अधिकाधिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होऊन खड्डय़ांची समस्या निश्चितच कमी होणार आहे. सन २०२३, २०२४ आणि २०२५ या तीनही वर्षांमध्‍ये प्रतिवर्ष खड्डे भरण्‍याकामी केल्‍या जाणा-या खर्चामध्‍ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. नागरिकांची विशेषतः वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्ते विभागाचा संपूर्ण चमू रस्त्यांच्या देखभाल आणि दुरूस्तीसाठी प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळी (On Field) सतत तैनात असावा. खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी आपसात समन्वय व नियोजन राखावे, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले.


अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर म्‍हणाले की, २२७ प्रभागातील दुय्यम अभियंत्यांकडे प्रत्‍येकी १० ते १५ किलोमीटर रस्‍ते कार्यक्षेत्राची जबाबदारी आहे. फक्‍त कार्यालयात बसून कोणीही कामकाजाचा आढावा घेऊ नये. प्रत्‍यक्ष कार्यस्‍थळास वारंवार भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात राहिल, हे सुनिश्चित करावे. खड्डयाच्‍या दृष्‍टीकोनातून रस्‍त्‍याची पाहणी करताना दुय्यम अभियंत्‍यांनी दोन दिवसातून एकदा दुचाकीवरून दौरा करावा. जेणेकरून रस्‍त्‍याचा संपूर्ण विस्‍तार नजरेखाली येऊ शकेल. रस्‍त्‍याची स्थिती कळू शकेल. स्वयंप्रेरणेने, अधिक सक्रियपणे खड्डे शोधून ते वेळीच भरावेत. तक्रार आल्‍यानंतर खड्डे भरणे ही अस्‍वीकारार्ह बाब आहे. अभियंत्‍यानी सक्रियपणे खड्डे शोधून ते तातडीने भरल्‍यास नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागणार नाही.


खड्डे भरण्‍याची कार्यवाही आठवडाभर सुरू राहणार असली तरी शनिवार आणि रविवार या दोन्‍ही दिवशी खड्डे बुजविण्‍याची कामे अधिक वेगाने करावीत, असे नमूद करताना बांगर म्‍हणाले की, शनिवारी आणि रविवारी इतर दिवसांच्‍या तुलनेत वाहतुकीची वर्दळ कमी असते. त्‍यामुळे या दोन्‍ही दिवशी खड्डे बुजविण्‍याची कार्यवाही अधिक वेगाने करावी. जेणेकरून कामानिमित्‍त सोमवारी घराबाहेर पडणा-या नागरिकांना सुखद अनुभव मिळू शकेल. कोणताही खड्डा एका रात्रीत मोठा होत नाही. खड्डा ६ ते १२ इंचाचा असतानाच तो भरणे अपेक्षित आहे. रस्त्यांची चाळण झालेली, खड्ड्यात रस्ता अशा बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. संबंधितांवर अत्‍यंत सक्‍त कारवाई केली जाईल. कोणत्‍याही परिस्थितीत अशी स्थिती उद्भवणार नाही, याची दक्षता घ्‍यावी, अशी ताकीद देखील अतिरिक्त महानगरपालिका (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिली.


खड्डा भरताना तो चौकोनी आकारात भरावा. त्‍याचा आकार ओबडधोबड नसावा. सहा मीटरपुढील रस्‍त्‍यांवर आढळणारे खड्डे बुजविण्‍यासाठी कोल्‍ड मिक्‍सचा वापर करू नये. केवळ मास्टिक अस्‍फाल्‍टद्वारे खड्डे बुजवावेत. या व्‍यतिरिक्‍त काही रस्‍त्‍यांवर जीओ पॉलिमर काँक्रिटचा वापर करावा, अशा सूचनादेखील बांगर यांनी केल्‍या.


अभिजीत बांगर म्‍हणाले की, मास्टिक कुकर हे सुस्थितीत तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करण्यात यावी. सर्व संबंधित कंत्राटदारांना सूचना करून मास्टिकचे उत्पादन व उपलब्धतता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी विशेष लक्ष द्यावे. प्रत्‍येक कंत्राटदारामागे मास्टिक प्रकल्‍प असावेत. जेणेकरून एका प्रकल्‍पाचा पुरवठा बाधित झाल्‍यास तर दुसरा पर्याय उपलब्‍ध राहिल. शनिवार आणि रविवार कोणते मास्टिक प्रकल्‍प सुरू राहणार आहेत याची निश्चिती आठवड्याच्‍या सुरूवातीलाच करावी जेणेकरून खड्डे भरण्‍याची कार्यवाही आठवडाभर सुरू राहिल. सहायक अभियंता यांनी आपल्‍या अधिनस्‍त कार्यरत दुय्यम अभियंत्‍यांकडून माहिती घेऊन मार्ग निश्चिती (Route Plan) करावी. त्‍याुनसार, मास्टिक कुकरची उपलब्‍धता करून घेऊन दररोज रात्री किंवा आवश्‍यकतेनुसार, खड्डे भरण्‍याची कार्यवाही होईल, हे सुनिश्चित करावे. मास्टिक कुकर वाहनाला जागतिक स्थिती प्रणाली (Global Positioning System) उपकरण बसवून व्‍हेईकल ट्रॅकिंग सिस्‍टीम (VTS) द्वारे त्‍याच्‍या कामकाजाचा मागोवा घेतला जाईल. हे अनिवार्य आहे. मास्टिक कुकर वाहनाला जर 'जीपीएस' प्रणाली नसेल तर मास्टिक कुकरने केलेल्‍या कामाचा मोबदला देय राहणार नाही, असे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त बांगर यांनी दिले.

Comments
Add Comment

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी