निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

  39

राहुरी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित तालुकास्तरीय वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राहुरी तालुक्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी येथे सुरू आहे.


प्रशिक्षण २ जून ते १२ जून २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे तालुक्यातील १४७ प्रशिक्षणार्थी शिक्षक सहभागी झाले आहेत प्रशिक्षण वर्गास तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहनीराज तुंबारे यांनी भेट देऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.


संबंधित प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी शिक्षक यांच्यासाठी महत्त्वाचे असून असून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२० शी सुसंगत असल्याने संबंधित प्रशिक्षणाचा फायदा शिक्षकांना अध्यापनात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रशिक्षणाच्या प्रत्येक दिवशी परिपाठ दृकश्राव्य प्रदर्शन तासिका व स्वाध्यायाचे आयोजन करण्यात आले आहे.


प्रशिक्षणार्थी उपस्थिती ऑनलाईन असून दर तासिकेला प्रशिक्षणार्थी यांची ऑनलाईन उपस्थिती नोंदवण्यात येते प्रशिक्षणाच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षणार्थी यांची परीक्षा होणार असून सदर परीक्षेत ५० टक्के गुण मिळवणे गरजेचे आहे.शाळेचे प्रा.अरूण तुपविहिरे यांनी प्रशिक्षण ठिकाणी प्रशिक्षणार्थी यांना वॉटर फिल्टर पिण्याच्या पाण्याची सुविधा (पाणीजार) उपलब्ध करून देण्यात आले आहेत प्रशस्त वाहन पार्किंग सुविधा प्रशस्त वर्गखोल्या प्रत्येक वर्गात एलसीडी प्रोजेक्टर.


इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे प्रत्येक वर्गासाठी चार प्रमाणे तज्ञ सुलभक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रशिक्षणासाठी आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्धकरून देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण चांगल्या प्रकारे सुरू असल्याने गटशिक्षणाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले प्रशिक्षण तालुका समन्वयक म्हणून विस्तार अधिकारी सुमन सातपुते या काम पाहत आहे.

Comments
Add Comment

शेतीला आता AI ची जोड! आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळणार दुप्पट मानधन; मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय

राज्यात AI शेतीधोरणास मंजुरी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ

बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनवणी पुढे ढकलली? 

बीड : बीड जिल्हातील संतोष देशमुख हत्याप्रकरणतील (santosh deshmukh murder case)  सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मकोका न्यायालयातील

साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य समेलंन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड...

  सातारा : साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे या ९९ व्या मराठी साहित्य

Freyr Solar Energy Maharashtra: ठरले ! फ्रेयर एनर्जी महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्षेत्रात उचलणार मोठे पाऊल!

महाराष्ट्रात २०००० हून अधिक, व २००० एसएमई उद्योगांना सौर ऊर्जा पुरवठा करणार प्रतिनिधी: फ्रेयर एनर्जी

पालखी महामार्गावरील अपघातात एक महिला ठार; सहाजण जखमी

सोलापूर : नातेपुते शहराच्या पश्चिमेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील समाधान ढाब्याजवळ व्हॅनचा

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य