कुडूस : रात्र झाली की पाड्यांवर जाणाऱ्या पण अंधारात हरवणाऱ्या पायवाटा व पिण्याच्या पाण्यासाठी बोरिंग वर कष्ट करणाऱ्या खुपरी गावातील महिलांची कथा आता इतिहासजमा झाली आहे. रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर व त्यांच्या सी.एस.आर. भागीदार एस.आय.टी.ए. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटिंग (इंडिया) प्रा. लि. यांच्या संयुक्त प्रयत्नातून १२ लाख रुपये खर्चून खुपरी गावात ५४ सौर रस्त्याचे दिवे व २ सौर पाणी प्रकल्प यांचे लोकार्पण नुकताच करण्यात आले.
बँकॉकहून आलेल्या प्रवाशाच्या बॅगेतून वन्यजीव ताब्यात
प्रवाशाला अटक; मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने केलेल्या ...
खुपरी गावातील लाटे पाडा -७, ठाकरे पाडा- १०, हडल पाडा -१७ व भोईर पाडा -२० या ठिकाणी सौर रस्त्याचे दिवे बसवण्यात आले आहेत. आता या पाड्यांतील रस्ते उजळले असून, गावकऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधानाचं हास्य फुलले आहे. रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडताना वाटेवरील भीती आता मागे पडली आहे. त्याचवेळी लाटे पाडा आणि कोंगिल पाडा येथील जुन्या हातपंप बोअरवेलना सौरऊर्जेवर चालणाऱ्या टाक्यांमध्ये रूपांतर करून महिलांना पाण्यासाठीच्या त्रासातून मुक्ती दिली आहे. खुपरी ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर पवार यांनी आनंद व्यक्त करत आमच्या गावात असा मोठा बदल घडेल, असं आम्ही स्वप्नातही पाहिलं नव्हतं. एस.आय.टी.ए. कंपनीचे धवल व्यास, ललित तिवारी, संचालक राजेन्द्रन सर आणि रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष अविनाश सर यांनी आमच्या गावासाठी दिलेला आधार अविस्मरणीय आहे. लवकरच येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यास केंद्र आणि महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.