प्रतिनिधी: मुदत ठेवी (Fixed Deposit) गुंतवणूकदारांसाठी वाईट बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दरात शुक्रवारी कपात केली. ०.५० टक्क्यांची कपात केल्यानंतर अनेक बँकांनी आपले कर्जावरील व्याजदर देखील कमी केले होते. मात्र त्याचा 'रिव्हर्स इफेक्ट ' देखील ग्राहकांना सहन करावा लागत आहे. रेपो दर कपातीनंतर आता आयसीआयसीआय बँकेने आपल्या मुदत ठेव (FD) वरील देत असलेल्या व्याजदरात कपात करण्याचे ठरवले आहे. संकेत स्थळावरील अधिकृत माहितीनुसार आयसीआयसीआय बँकेने आपल्या मुदत ठेव व्याजदरात २५ बेसिस पूर्णांकाने घट केली आहे. मुदत ठेवीवरील व्याजदर कमी करण्यात आयसीआयसीआय बँकेने दुसरा क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी ६ जूनला आयडीएफसी बँकेने व्याजदरात कपात करून प्रथम क्रमांक पटकावला होता.
त्यामुळे नव्या नियमानुसार आता आयसीआयसीआय बँकेत मुदतठेवीत वेगवेगळ्या साधारण प्रवर्गात ३ ते ६.६ टक्के व्याजदर मिळू शकतो. तर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवर्गात ३.५ ते ७.१ टक्के व्याजदर मिळू शकतो. यापूर्वी बँकेत सर्वोत्तम व्याजदर ७.३ व ६.८४ टक्के होता त्यामध्ये जवळपास ०.२० पूर्णांकाहून अधिक घट झाली आहे. आयसीआयसीआय बँकेने अनेक कालावधीच्या मुदत ठेवी (एफडी) व्याजदरात कपात केली आहे. ४६ ते ९० दिवसांच्या मुदत ठेवींसाठीसाठी व्याजदर ४.२५% वरून ४% पर्यंत कमी करण्यात आला आहे तर ९१ ते १८४ दिवसांसाठीचा व्याजदर ४.७५% वरून ४.५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
असे आहेत व्याजदर -
काळ सामान्य नागरिक ज्येष्ठ नागरिक
७ ते ४५ दिवस ३.००% ३.५०%
४६ ते ९० दिवस ४.००% ४.५०%
९१ ते १८४ दिवस ४.५०% ५.००%
१८५ ते २७० दिवस. ५.५०%. ६.०%
२७१ ते १ वर्ष ५.७५% ६.२५%
१ वर्ष ते १५ महिने. ६.२५%. ६.७५%
१५ ते १८ महिने ६.३५%. ६.८५%
१८ महिने ते २ वर्ष ६.५०% ७.०%
२ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष ६.६०% ७.१०%
५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष. ६.६०% ७.१०%
५ वर्ष टॅक्स सेविंग फंड ६.६०% ७.१०%
संकेतस्थळावरील माहितीनुसार अकाली पैसे काढल्यास ठेवीवरील व्याज बँकेकडे राहिलेल्या कालावधीसाठी मुदत ठेवीच्या वास्तविक कालावधीसाठी बुकिंगच्या वेळी असलेल्या प्रचलित दराने दिला जाईल. करारबद्ध दराने आणि लागू दंड वजा केल्यानंतर नाही असे आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वेबसाइटवर म्हटले आहे.