बियाणांसोबत शेतकऱ्यांना खतांची व इतर सक्ती नको : मच्छिंद्र मंडलिक

  35

अकोले : अकोले अदिवासी तालुक्यामध्ये मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी राजा मोठ्या प्रमाणात अगोदरच उध्वस्त झालेला आहे. तशातच तरीही सर्व सामान्य शेतकऱ्यांना बी -बियाणे व खते खरेदीसाठी दुसऱ्यांकडून पैशाची उसनवारी करून तसेच सावकाराचे उंबरठे झिजवावे लागतात.
तसेच कृषीच्या काही बोगस कंपन्यांनी बी-बियाणे व खत वाटप चालु केलेले आहे या वेळी लिंकिंगच्या नावा खाली इतर खते विकत घेण्याची सक्ती होत आहे त्यातून शेतकऱ्यांना हा अतिरिक्त खर्च होऊन त्याची आर्थिक फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे व होत असती.


अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्राने जागतिक ग्राहक दिनात तक्रार दाखल केली असता तहसीलदार डॉ.सिध्दार्थ मोरे यांनी दखल घेऊन त्यांचे कार्यालयाचे पत्र क्र. कावीपू/३३/२०२५ अकोले दि.२७/३/२०२५ रोजीचे तालुका कृषी अधिकारी अकोले व कृषी अधिकारी पंचायत समिती यांना दिले.रील याची दखल घेऊन तालुका कृषी अधिकारी अकोले व गुणनियंत्रण निरीक्षक पंचायत समिती अकोले यांच्या जा.क्र.कृषी/गुनि/१२४/२५ अकोले दि.२४/४/२०२५ व आवक जावक विभाग पंचायत समिती अकोले यांच्या पत्रात नमुद केल्या प्रमाणे अकोले तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालक व व्यवस्थापक यांना पत्र देण्यात आले असून त्यात म्हटले.


सर्व कृषी निविष्ठा विक्रेते यांना या द्वारे सक्त सूचित करण्यात येत आहे की, आपल्या विक्री केंद्रा मार्फत कायद्यानुसार मान्यता देण्यात आलेल्या निविष्ठांचीच विक्री करण्यात यावी. त्या संदर्भात परवाना/ओ फॉर्म समावेश /स्टेटमेंट १.२ या बाबीची पूर्तता करूनच विक्री करण्यात यावी.तरी वरील संदर्भात काही त्रुटी आढळल्यास बियाणे नियंत्रण कायदा १९८३, किटकनाशके कायदा १९८६.रा.खते नियंत्रण कायदा १९८५ च्या तरतुदीनुसार आपण कारवाईस पात्र राहाल याची नोंद घ्यावी असे नमुद केलेले आहे.


निवेदनावर अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्तात्रय शेनकर, कार्याध्यक्ष महेशराव नवले, सचिव रुद्रे, माधवराव तिटमे, सिताराम भांगरे, रामहारी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, भाऊसाहेब वाळुंज, ॲड.दिपक शेटे, ॲड राम भांगरे, रामदास पांडे, नरेंद्र देशमुख, सुनिल देशमुख, प्रमोद मंडलिक, भाऊसाहेब वाकचौरे, कैलास तळेकर, गंगाराम धिंदळे, मोहन मुंढे, राजेंद्र घायवट, पांडुरंग पथवे, सखाराम खतोडे, दत्ता ताजणे, सुदाम मंडलिक, ज्ञानेश पुंडे, प्रकाश कोरडे आदींचे नावे आहे अशी माहिती मच्छीन्द्र मंडलिक यांनी दिली.

Comments
Add Comment

शेतीला आता AI ची जोड! आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना मिळणार दुप्पट मानधन; मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय

राज्यात AI शेतीधोरणास मंजुरी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ

बीड : संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनवणी पुढे ढकलली? 

बीड : बीड जिल्हातील संतोष देशमुख हत्याप्रकरणतील (santosh deshmukh murder case)  सुनावणी पुढे ढकलण्यात आली. मकोका न्यायालयातील

साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य समेलंन, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची एकमताने निवड...

  सातारा : साताऱ्यात ३२ वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यामुळे या ९९ व्या मराठी साहित्य

Freyr Solar Energy Maharashtra: ठरले ! फ्रेयर एनर्जी महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्षेत्रात उचलणार मोठे पाऊल!

महाराष्ट्रात २०००० हून अधिक, व २००० एसएमई उद्योगांना सौर ऊर्जा पुरवठा करणार प्रतिनिधी: फ्रेयर एनर्जी

पालखी महामार्गावरील अपघातात एक महिला ठार; सहाजण जखमी

सोलापूर : नातेपुते शहराच्या पश्चिमेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील समाधान ढाब्याजवळ व्हॅनचा

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...

मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकण आणि मध्य