Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, लॉस एंजेलिसमध्ये आणखी २ हजार नॅशनल गार्डस्‌ तैनात

ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो


लॉस एंजेलिस : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ‘नॅशनल गार्ड’च्या सैनिकांची कुमक तैनात केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी लाखो बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेतून त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आल्यानंतर, आता आणखी अशा स्थलांतरितांची अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. नॅशनल गार्ड्स तैनात झाल्यानंतर तेथील परिस्थिती आणखी चिघळली असून आंदोलकही आक्रमक झाले आहेत. काल या स्थलांतरविरोधी कारवाईच्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.



आणखी २ हजार नॅशनल गार्ड्स तैनात करण्यास मान्यता


दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर सुरु करण्यात आलेल्या इमिग्रेशन मोहिमेविरोधात लॉस एंजेलिसमध्ये गेल्या चार दिवसांपासून आंदोलन भडकले आहे. बेकायदा स्थलांतरितांच्या घरावर छापे टाकल्यानंतर तिथे आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरु आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनाविरोधात आणखी कठोर पाऊल उचलत लॉस एंजेलिसमध्ये अतिरिक्त २००० नॅशनल गार्ड्स तैनात करण्यास मान्यता दिली. तत्पूर्वी स्थलांतरविरोधी कारवाईच्या विरोधात लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सोमवारी नॅशनल गार्डला मदत करण्यासाठी सुमारे ७०० मरीन (लष्कराचे जवान) तैनात केले होते.

Comments
Add Comment

Afghan Foreign Minister Muttaqi India Visit : अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री भारतात! संबंध दृढ करण्यावर दोन्ही देशांचा भर

नवी दिल्ली/काबूल : अफगाणिस्तानचे (Afghanistan) परराष्ट्र मंत्री अमीर मुत्ताकी भारत दौऱ्यावर असून नवी दिल्लीत दाखल झाले

सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’चे कामकाज ठप्प !

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सरकारी कामकाजावरील बंदीमुळे ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेचे कामकाज सध्या ठप्प झाले

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला फटकारले!

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानला खडे बोल सुनावले. पाकिस्तानचे वागणे

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा

स्टॉकहोम : वैद्यकशास्त्रातील (मेडिसिन) २०२५ चा नोबेल पुरस्कार अमेरिकेच्या मेरी ई. ब्रंकॉ आणि फ्रेड रैम्सडेल तसेच

गाझातील सत्ता न सोडल्यास हमासची धुळधाण करू

डोनाल्ट ट्रम्प यांची ताकीद वॉशिंग्टन डीसी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझामधील

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या