Ex Dividend Stocks: आज एशियन पेन्ट्ससगट 'या' समभागावर लाभांश कमावण्यासाठी अखेरची संधी आज एक्स डिव्हीडंटचा शेवटचा दिवस

प्रतिनिधी: आज एशियन पेन्ट्स, इंडियन बँक, हिताची एअर कंडिशनिंग, टाटा इनव्हेसमेंट कॉर्पोरेशन या कंपन्याचे समभाग पूर्व लाभांश (Ex Dividend) बाजारात ट्रेंडमध्ये राहणार असून संपूर्ण बाजाराचे लक्ष या समभाग (Shares) कडे लागले आहे. आज १० जूनला या कंपन्याचे समभाग ट्रेंड राहतीलच पण कोणी गुंतवणूकदार लाभांश प्राप्त करण्यासाठी इच्छूक असल्यास आज अखेरची तारीख आहे.यानंतर या समभागात गुंतवणूक केल्यास लाभांश मिळणार नाही. नुकतीच एशियन पेन्ट्स कंपनीचा निफ्टी निर्देशांक (Nifty Index) मध्ये समावेश झाला होता. आज या कंपन्यांच्या एक्स लाभांश ट्रेंड करण्याची शेवटची संधी असणार आहे.

या कंपन्यांनी यापूर्वी एशियन पेन्ट्स २०.५५ रूपये प्रति समभाग तर इंडियन बँक (१६.२५ रूपये), हिताची (Johnson Controls - Hitachi Air Conditioning) कंपनी १५ रूपये तर टाटा इनव्हेसमेंट कॉर्पोरेशन २७ रूपये प्रति समभाग लाभांश आपल्या गुंतवणूकदारांना देणार आहे.

एक्स डिव्हिडेटं (लाभांश) असतो काय?

जेव्हा गुंतवणूकदारांसाठी एखाद्या कंपनीचा समभाग सूचीबद्ध (Listed) असतो व कंपनी जेव्हा आपल्या नफ्यात वाढ झाल्यानंतर आपल्या गुंतवणूकदारांसाठी प्रत्येक शेअर्सवर लाभांश म्हणजेच आपल्या नफ्यातील हिस्सा देते. या ट्रेंडचा दिवशी या कंपन्याचे समभाग खरेदी करणारे गुंतवणूकदारच लाभांश मिळवण्यासाठी पात्र असतात. त्यानंतर मुदतीनंतर खरेदी केल्यावर संबंधित गुंतवणूकदारांना लाभांश मिळत नाही.

Vesuvius India कंपनीचा Stock Split होणार -

आज १० जूनला  व्हेसुव्हियस इंडिया (Vesuvius India) या कंपनीने आपल्या समभागाचे विभाजन (Stocks Split) करण्याचे ठरवले आहे. यापूर्वी घोषित केलेल्याच समभागाचे विभाजन होऊ शकते. ज्या समभागाचे १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) आहे या समभागात १० रूपयांच्या समभागाऐवजी १ रुपयांचे १० समभाग बाजारात आणणार आहे. आज सकाळी या समभागात तब्बल ८.३९ % वाढ झाली आहे. या समभागांची किंमत ६३७ रुपये प्रति समभाग सुरू आहे.
Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

डोंबिवलीत १०७ तितर पक्ष्यांचा मृत्यू

डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील मोठगाव–ठाकुर्ली सातपुल परिसरात आज अचानक १०७ तितर पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत.

बिग बॉस १९ स्पर्धकांना दाखवली ट्रॉफीची पहिली झलक, टॉप ५ स्पर्धकांचे डोळे दिपले

मुंबई : बिग बॉस १९ चा ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील पाच फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. बिग बॉसने या सीझनच्या