Thursday, September 11, 2025

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक १७ तासांनंतर सुरू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai-Goa highway) निवळी घाटात सीएनजी टँकर आणि खासगी मिनी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. या दुर्घटनेनंतर घाटातील दोन्ही मार्गावर वाहतूक १७ तासांनी सुरू झाली.

अपघातामुळे रस्त्यावर दोन्ही वाहने आडवी होऊन मोठा अडथळा निर्माण झाला होता. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रशासन, पोलीस, महामार्ग विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांनंतर मध्यरात्रीनंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

वाहतूक सुरळीत झाली असली तरी रस्त्यावर अजूनही वाहनांची गर्दी असून नागरिकांना काळजीपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा