Cargo Ship Catches Fire: न्हावा शेवाच्या दिशेने येणाऱ्या मालवाहक जहाजाला भर समुद्रात महाकाय आग, क्रू मेंबर्स आगीत होरपळले

  129

केरळ: सोमवारी सकाळी केरळच्या कोझिकोड किनाऱ्याजवळ WAN HAI 503 नावाच्या मालवाहू जहाजाला महाकाय आग (Cargo Ship Catches Fire) लागल्याची घटना घडली आहे. हे जहाज कोलंबोहून न्हावा शिवा येथे येत होते. या अपघातात जहाजातील सुमारे ५० कंटेनर समुद्रात पडले. अरबी समुद्रातील बेपोर-अझिक्कल बंदराच्या पश्चिमेस सुमारे ४० किमी अंतरावर ही आग लागली. या मालवाहू जहाजाला लागलेल्या महाकाय आगीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.


केरळच्या समुद्रकिनाऱ्याजवळ कोची येथे ही दुर्घटना घडली आहे. या जहाजात ६५० कंटेनर होते आणि त्यात २२ क्रू मेंबर्स होते. आगीदरम्यान १८ क्रू मेंबर्सनी समुद्रात उड्या मारल्याचे वृत्त आहे. ५ क्रू मेंबर्सना भाजून गंभीर दुखापत देखील झाली आहे. तर  ५  क्रू मेंबर्स बेपत्ता आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार कोचीपासून सुमारे ३१५ किमी अंतरावर जहाजाच्या अंडरडेटकमध्ये हा स्फोट झाला आहे.



अगोदर आग नंतर मोठा स्फोट


आग लागलेल्या या जहाजाचा व्हिडीओ समोर आला आहे. हेलिकॉप्टरमधून हे दृश्य टिपण्यात आले आहे. या जाहजाच्या कंटेनरमध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर या जहाजाचा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेत काही क्रू मेंबर्स बेपत्ता झाले आहेत. मात्र या स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या या मालवाहू जहाजातील क्रू मेंबर्सची सुखरुप सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.





भारतीय नौदलाने अधिकृत निवेदन केले जारी


या दुर्घटनेनंतर भारतीय नौदला (Indian navy) ने अधिकृत निवेदन जारी केले आहे. कोझिकोडमधील बेपोरच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाला आग लागली. हे जहाज मूळचे सिंगापूरचे आहे. या जहाजाची लांबी 270 मीटर आहे तर रुंदी ही 12.5 मीटर आहे. हे जहाज कोलंबो येथून 7 जून रोजी निघाले होते. 10 जून रोजी हे जहाज एनपीसी मुंबई येथे येणार होते, असे भारतीय नौदलाने सांगितले आहे. पण मुंबईत येण्याआधीच या जहाजातील कंटेनर्सना आग लागली.


केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी एर्नाकुलम आणि कोझिकोड जिल्हाधिकाऱ्यांना जहाजातील कर्मचाऱ्यांना किनाऱ्यावर आणल्यावर त्यांच्यासाठी रुग्णालयात उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने कोची येथून तीन इंटरसेप्टर बोटी आणि बेपोर येथून अधिक पथके तैनात केली आहेत. नौदलाने घटनास्थळी डॉर्नियर हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.

Comments
Add Comment

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.

व्लादिमीर पुतिन डिसेंबरमध्ये भारतात दौऱ्यावर येणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करणार द्विपक्षीय चर्चा नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आगामी

हिमाचल प्रदेश : चंबा येथे दरड कोसळून ११ जणांचा मृत्यू

शिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा आणि भरमौर परिसरात जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. भरमौर परिसर