Saturday, October 25, 2025
Happy Diwali

ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

ऑनलाइन ११ वी प्रवेशासाठीची नोंदणी पुरेशा प्रमाणात

शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये मागील वर्षी सुमारे १३ लाख विद्याथ्यांनी प्रवेश घेतले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या प्रवेश फेरीसाठी १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ही नोंदणी पुरेशा प्रमाणात झालेली असल्याची माहिती शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझडे यांनी दिली.

राज्यात दहावीत राज्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्याथ्यांची संख्या ही १३ लाख ८७ हजार असून, इतर मंडळातील संख्या एक लाख हजारांच्या दरम्यान आहे. असे एकूण १५ लाख २० हजारांच्या दरम्यान दहावीतील विद्यार्थी आहेत. मागील काही वर्षांतील अकरावीची आकडेवारी लक्षात घेता अकरावीला १३ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात, तर उवरित व्यवसाय शिक्षण, तंत्रशिक्षण आदी शाखेकडे वळतात.

या पार्श्वभूमीवर यंदाच्या अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी ५ जूनपर्यंत १२ लाख ७१ हजार विद्याथ्यांनी नोंदणी केली. त्यातील १२ लाख पाच हजार विद्याथ्र्यांनी या नोंदणीचे शुल्क भरून प्रवेशाचा पहिला भाग पूर्ण केला असल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्याथ्यांना पाचही टप्प्यांवर नोंदणी, प्राधान्यक्रम भरण्याची मुभा देण्यात आली आहे. अर्ज भरताना शेवटच्या दिवसापर्यंत अर्जामध्ये बदल करण्याची सुविधा देण्यात आल्याने याचा विद्याथ्यांना मोठा लाभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment