Saturday, October 25, 2025
Happy Diwali

घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला; भाषिक वाद पुन्हा पेटणार!

घाटकोपरमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला; भाषिक वाद पुन्हा पेटणार!

मुंबई : घाटकोपरमधल्या रायगड चौकात एका मराठी कुटुंबावर घरात घुसून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुत्रा पाळल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका गुजराती कुटुंबाने तीन भावांच्या मदतीने ही मारहाण केल्याचा आरोप पीडित मराठी कुटुंबाने केला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या घटनेमुळे पुन्हा एकदा “महाराष्ट्रात मराठी माणसाचं काय चाललंय?” हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाषिक वाद चिघळताना दिसतोय आणि मुंबईतही अशा घटना सतत घडत आहेत.

घाटकोपरमधील ही घटना मराठी अस्मितेला धक्का देणारी मानली जात असून, भाषिक तेढ वाढवणाऱ्या अशा घटनांवर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.

Comments
Add Comment