Mumbai Train Accident: मध्य रेल्वे मार्गावर भीषण अपघात! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, ६ जणांचा मृत्यू

दोन लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासल्याने भयंकर घटना


ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज ९ जून रोजी सकाळी एक मोठा अपघात झाला आहे. ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. या लोकलमधील काही प्रवासी बाहेर लटकत असताना, बाजूने जाणाऱ्या लोकलला घासली गेली, आणि रेल्वे रुळावर कोसळली. यात काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई लोकलमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमधील बाहेर लटकलेले प्रवासी आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे ही भयंकर घटना घडली आहे.  लोकलच्या दरवाज्यात लटकलेली १० ते १२ प्रवासी धावत्या ट्रेनमधून रुळावर पडल्याचे समोर आले आहे.  या अपघातामध्ये  ६ पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रवासी ३० ते ३५ वयोगटातील असल्याचेही समजतेय.



मध्य रेल्वेकडून देण्यात आली माहिती


"ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर सीएसएमटीकडे जाणारे काही प्रवासी ट्रेनमधून पडले. ट्रेनमध्ये जास्त गर्दी असल्याने हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. रेल्वे प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. या घटनेमुळे स्थानिक सेवांवरही परिणाम झाला आहे," अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

सदर घटनेवर माजी आमदार विद्या चव्हाण यांनी संताप व्यक्त केला आहे. सदर अपघातासाठी रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. अपघात झाला तेव्हा रेल्वे स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिका नव्हती. मुंबई लोकलची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. प्रवाशांना अद्याप चांगली सुविधा मिळत नाहीय. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते, लोक दरवाजाबाहेर उभे राहून प्रवास करतात. रेल्वेला उशीरा होतो, तेव्हा रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढते. यावेळी अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवाशी लोकलमध्ये चढतात, असं माजी आमदार विद्या चव्हाण म्हणाल्या.

Comments
Add Comment

गोराई बीचवर भरतीच्या लाटेत बस गेली वाहून, प्रवाशांचं काय झालं पहा...

मुंबई: गोराई बीचवर सोमवारी एक थरारक घटना घडली. एक मिनीबस भरतीमुळे समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने घबराट

उज्जीवन स्मॉल फायनान्सकडून धोरणात्मक विस्तार सुरु 'पर्यायी निधी उभारणी स्त्रोताचा आमच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही '.....

मोहित सोमण: आरबीआयच्या रिपोर्ट आकडेवारीचा विशेषतः आमच्या ग्राहकांच्या अनुषंगाने कुठलाही परिणाम होणार नाही असे

मतदान ओळखपत्र नोंदणीसाठी 'आधार' बारावा दस्तऐवज; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

नवी दिल्ली: बिहारमधील एसआयआर (Systematic Integrity Review) प्रणालीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब

टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून वेईकल्‍सच्‍या किमतीमधील कपातीची घोषणा

मुंबई:टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (TKM)ने आज सरकारच्या जीएसटी कपातीतील अनुषंगाने आपल्याही वाहनांच्या किंमतीत कफात

'प्रहार' Stock Market विश्लेषण: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद ऑटो Stock जोरदार मात्र 'हा' धोका आजही परिणामकारक

मोहित सोमण:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांक अखेरीस किरकोळ वाढ आज बंद झाला. शेअर बाजारात आज शेवटच्या सत्रात वाढ