Crisil Thali Report: मे महिन्यात घरगुती थाळी ६ टक्क्याने स्वस्त - क्रिसील अहवाल

प्रतिनिधी: क्रिसिल (CRISIL) रिसर्चने आपला नवा अहवाल प्रदर्शित केला आहे. त्यांनी आपल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे वर्षानुवर्षे आधारावर (Year on Year YoY) बेसिसवर घरगुती शाकाहारी व मांसाहारी थाळी ६ टक्क्याने स्वस्त झाल्या आहेत. यानुसार मे महिन्यात शाकाहारी थाळीच्या किंमती 'जैसे थे' राहिल्या असून मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली. याशिवाय कंपनीच्या अहवालानुसार खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये आयातीवरील वाढविलेल्या शुल्कामुळे तब्बल १९ टक्के वाढल्याचे म्हटले आहे. क्रिसिलच्या विश्लेषणानुसार, गेल्या वर्षी उत्पादनाच्या चिंतेमुळे टोमॅटोच्या किमती वाढल्या होत्या, त्यामुळे मे २०२५ मध्ये टोमॅटोचे दर ३३ रुपये प्रति किलोवरून २९ टक्क्यांनी घसरून २३ रुपये प्रति किलो झाले.


एलपीजी गॅस मध्ये झालेल्या भरमसाठ वाढीमुळे या शाकाहारी थाळीच्या किंमती कमी होऊ शकल्या नाहीत असे अहवालात म्हटले आहे. मासाच्या खासकरून ब्रोइलर मधील वर्षाला ६ टक्के घट झाल्याने मांसाहारी (Non Veg) थाळीच्या किंमतीत घट झाली.महाराष्ट्रातही मागणीपेक्षा पुरवठ्यात वाढ झाल्याने या मांसाहारी थाळीच्या किंमती नियंत्रित राहिल्या असे निरिक्षण अहवालात नोंदवण्यात आले आहे. रब्बी हंगामातील कमी क्षेत्र आणि उत्पादनामुळे कांद्याचे भाव वाढले होते. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होती.


मे महिन्यात शाकाहारी (Veg) थाळीचे दर मात्र नियंत्रित राहिले आहेत तर पुन्हा एकदा मांसाहारी थाळीत २ टक्क्याने घट झाली आहे. याशिवाय बटाटा आणि टोमॅटोच्या किंमती महिन्याला अनुक्रमे ३% आणि १०% ने वाढल्या, तर कांद्याच्या किमती १०% घसरल्या, ज्यामुळे शाकाहारी थाळीच्या किमती महिन्याला बदलल्या नाहीत. ब्रॉयलरच्या किमतीत अंदाजे ४% घट झाल्याने मांसाहारी थाळीच्या किमतीत घट झाली.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक