Mumbai Railway Accident: अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे केले जाणार रीडिझाईनिंग


ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातानंतर, (Mumbai Railway Accident) रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या खचून भरणाऱ्या डब्यांच्या दरवाजांना आता ऑटोमॅटिक दरवाजे बसवले जाणार आहे. ज्यामुळे ट्रेनबाहेर लटकणारे प्रवाशी आणि त्यामुळे होणारे संभाव्य अपघात टाळता येऊ शकतील.


आज सकाळी, आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईकर आपापल्या कामाला निघाले असता,  मुंब्रा आणि दिवा दरम्यान खच्चून भरलेल्या दोन्ही लोकलचे बाहेर लटकलेले प्रवासी एकमेकांना घासल्याने ही भयानक दुर्घटना घडली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना इतकी भीषण होती की १० ते १२ प्रवासी धडाधड रेल्वे रुळावर कोसळली, ज्यामधील अनेकजण जखमी झाले तर काहींचा जागीच मृत्यू झाला.


असा अपघात पुन्हा घडू नये म्हणून, रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे की मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत तयार होणाऱ्या प्रत्येक कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवले जातील. याशिवाय सध्या वापरात असलेल्या मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे पुनर्रचना (रीडिझाईनिंग) करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये देखील ऑटोमॅटिक दरवाजे बंद होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती मध्ये रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला यांनी दिली आहे. तर सुरुवातीला पुष्पक एक्स्प्रेसमधून हे प्रवासी पडल्याची माहिती समोर आली होती. मात्र या अपघाताशी पुष्पक एक्स्प्रेसचा संबंध नसल्याची माहिती स्वप्नील नीला यांनी दिली आहे.



अपघात नेमका कसा झाला? 


याबाबत मध्ये रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला म्हणाले की, सीएसएमटी ट्रॅक आणि कसारा ट्रॅकवरून दोन लोकल या ट्रॅकवर एकमेकांना क्रॉस करत होत्या. दोन लोकल आजूबाजूला येताच प्रवासी एकमेकांना धडकले आणि ट्रॅकवर पडले. प्रवासी ट्रॅकवर पडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींवर सध्या कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.



प्रवाशांच्या बॅगांनी केला घात


मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात दोन्ही लोकल गाड्या होत्या. दोन्ही लोकलमधले अंतर दीड ते दोन मिटर असते. मात्र, प्रवाशांच्या बॅगा मागे होत्या, त्यामुळे दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगेचा धक्का एकमेकांना लागल्याने ही भीषण घटना घडल्याचे प्रवाशाचे म्हणणे आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडली आहे. ज्यात दोन्ही बाजूनं लोकल जात असताना फूटओव्हरवर लोकं उभे असताना पडले.



नव्या लाईनचे नियोजन


यावर उपाययोजन करण्यासंदर्भात रेल्वेने नव्या लाईनचे नियोजन केले आहेत. ठाणे ते सीएसएमटी सहाव्या लाईनपर्यंत अपग्रेड करण्यात येणार आहे. अअपघातस्थळी सीसीटीव्ही होते की नाही? लोकलमध्ये गर्दी किती होती? यासंदर्भात माहिती घेतली जाईल. याबाबत चौकशी केली जाईल. काही जणांमध्ये लोकलमध्ये भांडणं सुरु होते, अशी देखील माहिती समोर येत आहे. याबाबत आम्ही तपास करत असल्याची माहिती सीपीआरओ यांनी दिली आहे.



घटना अतिशय दुर्दैवी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


दरम्यान, दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

Comments
Add Comment

पतीकडून पत्नीची हत्या, शरीराचे केले १७ तुकडे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात एका नराधम पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या करून तिच्या शरीराचे १७ तुकडे

अरे बापरे! तब्बल १२ हजार कोटींची ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त! मीरा-भाईंदर पोलिसांची कमाल!

मीरा-भाईंदर: मीरा रोडमधील एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असताना

Mumbai Nasik Highway Accident: देवदर्शनानंतर घरी परतणाऱ्या बाप लेकीवर काळाचा घाला, ट्रकच्या धडकेने जागीच मृत्यू

ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडी येथील

ठाणे तहसीलदार कार्यालयात घडलं काय ? फेसबुक पोस्ट झाली व्हायरल, पोलिसांत तक्रार दाखल

ठाणे : ठाणे तहसीलदार कार्यालयामध्ये देवीदेवतांची पूजा करण्यात आल्याचा आणि नंतर ती पूजेचे सर्व साहित्य तिथून

Lift Collapse: कल्याणमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्टचा अपघात, आठ जणांपैकी चारजण गंभीर जखमी, तर दोघांचे पाय...

कल्याण: महाराष्ट्रातील कल्याण पश्चिम येथील रॉयस बिल्डिंगमध्ये सहाव्या मजल्यावरून लिफ्ट पडल्याने मोठी

ठाण्यात ८० हजार कुटुंबांचे धोकादायक इमारतींत वास्तव्य

इमारती रिकाम्या करण्यास रहिवाशांचा विरोध ठाणे : विरारमध्ये इमारत कोसळून १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची