Thursday, October 30, 2025
Happy Diwali

जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहाराविषयी जनजागृती

जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहाराविषयी जनजागृती

ठाणे : ‘व्यायाम हे शरीरासाठी ज्ञान असेल, तर सकस आहार हे चांगले संस्कार आहेत,’ या विचारातून ठाण्यातील वि.सा. सामान्य रुग्णालय येथे ‘आहाराचे आरोग्य’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. LHV प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या "Nutrition Lab" च्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी हा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अळीवाची खीर, नाचणीची चकली, बाजरीचे अप्पे, पौष्टिक ढोकळा, मेथीचे बिना साखरेचे लाडू अशा पारंपरिक व पौष्टिक पदार्थांचं सादरीकरण करण्यात आलं. आहारात विविध घटकांचा समावेश कसा करावा, हे तंतोतंत समजावण्यात आलं. पदार्थांची माहिती देतानाच त्यांचे आरोग्यावर होणारे परिणामही स्पष्ट करण्यात आले.

या उपक्रमाला अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धिरज महंगाडे व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राहूड, शुश्रुषा महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती श्रद्धा मेस्त्री व त्यांच्या टीमने कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं. यावेळी डॉ. संगीता माकोडे, डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. कल्पना माले व अधिसेविका श्रीमती मंजुळा घाणे यांनी पदार्थांची प्रत्यक्ष चव घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलं. पाककला आणि त्यामागील कृती, पोषणमूल्ये, आणि आरोग्य दृष्टिकोन यावेळी स्पष्ट करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे आरोग्याचं भान वाढतं, जनजागृती होते आणि रुग्णांशी अधिक सकारात्मक संवाद घडतो,अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या.

“सतत औषधांवर अवलंबून न राहता आहाराच्या माध्यमातूनही आरोग्य सुधारता येतं. फक्त त्यासाठी आहाराची योग्य माहिती, योग्य निवड आणि थोडा प्रामाणिक प्रयत्न हवा.”असे डॉ. कैलास पवारयांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा