Tuesday, July 1, 2025

व्हीआयपींच्या उपस्थितीत रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न

व्हीआयपींच्या उपस्थितीत रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा संपन्न
लखनऊ : भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा लखनऊ येथील द सेंट्रम या पंचतारांकीत हॉटेलच्या भव्य सभागृहात (हॉल) संपन्न झाला. या समारंभाला अनेक व्हीआयपी उपस्थित होते. समारंभासाठी सभागृह तसेच सभागृहातील स्टेज फुलं आणि रंगीत फुग्यांनी सजविण्यात आले होते. खुर्च्या पांढरे मुलायम कापड आणि पिवळ्या रंगाच्या रिबिनद्वारे सजविण्यात आल्या होत्या.



साखरपुड्याच्या आधी रिंकूने परिवारासोबत बुलंदशहरमधील चौधेरा वाली विचित्र देवी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. रिंकू आणि प्रिया यांचे प्री–एंगेजमेंट फोटोशूट झाले. ते सोशल मीडियात शेअर करण्यात आले. ठरलेल्या वेळी रिंकू आणि प्रिया छान तयार होऊन सभागृहात आले.

साखरपुड्यासाठी रिंकूने क्लासिक पांढरी शेरवानी आणि प्रियाने गुलाबी रंगाची लेहंगा परिधान केला होता. मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. याप्रसंगी प्रियाच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले. रिंकूनं प्रियाला अडीच लाख रुपयांची अंगठी घातली. रिंकू-प्रियाचे लग्न १८ नोव्हेंबर २०२५ रोजी वाराणसीत होणार आहे.



रिंकू आणि प्रियाच्या साखपुड्यासाठी आले मान्यवर

रिंकू आणि प्रियाच्या साखपुड्याला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, डिंपल यादव, जया बच्चन, इकरा हसन, राम गोपाल यादव यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.

 
Comments
Add Comment