Sunday, October 26, 2025
Happy Diwali

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

पुणे महापालिकेचे मिशन मूषक विनाश! नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’

पुणे: यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उंदराच्या उच्छादानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून महापालिका प्रशासनाने सर्वच नाट्यगृहांत ‘पेस्ट कंट्राेल’ करण्याची मोहीम हाती घेतली आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाटकाचा प्रयाेग सुरू असताना एका महिलेच्या साडीमध्ये उंदीर शिरला. यात उंदराचे नख लागल्याने या महिलेला इंजेक्शन घ्यावे लागले. या घटनेची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली हाेती. यानंतर महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागाने तत्काळ पावले उचलली असून, नाट्यगृहातील उंदरांचा बंदाेबस्त करण्यासाठी स्वच्छता माेहीम राबवण्यात आली आहे. किंबहुना ही स्थिती केवळ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा नसून, इतर नाट्यगृहमध्ये देखील तीच अवस्था असल्याचे अनेकांनी निदर्शनास आणून दिले आहे.

नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल

महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या सर्वच नाट्यगृह, प्रेक्षागृह आदी ठिकाणी पेस्ट कंट्राेल करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार कामाला सुरुवात देखील झाली आहे. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.

Comments
Add Comment