काव्यकोडी

  69

एकनाथ आव्हाड


गुरुजी


गुरुजी आमचे रोजच
फळ्यावर लिहायचे सुविचार
म्हणायचे सुविचारासारखा
मुलांनो हवा आचार

आधी करावे, मग सांगावे
असेच वागत जावे
नशिबापेक्षा मेहनतीलाच
अधिक आपले मानावे

अहंकाराचा कधीही
वारा लागू न द्यावा
कर्मावरच पुरता आपला
विश्वास ठेवावा

समस्या म्हणजे संधींचे
असते नवे रूप
स्वप्न पूर्ण करण्यासाठी
मेहनत करावी खूप

अडचणींचा सामना करणे
हे यशाचे प्रवेशद्वार
स्वतःवर विश्वास ठेवा
स्वप्नं तुमची होतील साकार

रोजच नवा दिवस
रोजच नवा सुविचार
सुविचारांमधील अर्थाचे
समजून घ्यावे सार

गुरुजी म्हणती सुविचारांना
द्यावी कृतीची जोड
कर्तव्याची फळे नेहमीच
लागत असतात गोड

 

काव्यकोडी


१) कुत्र्यासारखे तोंड
शेपूट झुपकेदार
शिकारीच्या शोधात
रात्री फिरतो फार

संस्कृतमध्ये याला
‘जंबूक’ सारे म्हणतात
‘कुँई कुँई’ आवाजात
कोण ओरडतात?

२) मागचे पाय कमकुवत
नसतो त्यात दम
जबडा मात्र या प्राण्याचा
असतो खूप भक्कम

दुसऱ्यांच्या शिकारीवर
जगणारा हा प्राणी
या प्राण्याचे नाव
लवकर सांगा कोणी?

३) घराची करतो राखण
गुन्ह्याचा लावतो तपास
अनेकांच्या सोबतीला
असतो बरं हमखास

रंग, रूप, आकार याचा
वेगवेगळा असतो
इमानदार प्राणी म्हणतात
कोण बरं दिसतो?

उत्तर -
१) कोल्हा
२) तरस
३) कुत्रा 

eknathavhad23 @gmail.com
Comments
Add Comment

पाऊस

कथा : रमेश तांबे एकदा काय झाले काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरून आले वारा सुटला सोसाट्याचा उडवत पाचोळा

झोप

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ शरीर तसेच मनाच्या विश्रांतीची ‘झोप’ ही नैसर्गिक अवस्था असते. झोप आपल्या शरीराला

उपयुक्तता व सौंदर्य एकाच नाण्याच्या दोन बाजू

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर आजच्या जगात आपल्याला काय आढळते. माणसे ही सौंदर्याच्या मागे लागलेली

स्व-जाणीव

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर जोमनुष्य स्वतःला व स्वतःच्या शक्तीला ओळखतो त्याला जीवनात सर्व काही

तुझ्या हाताच्या चवीचं...

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ बाबा सरकारी नोकरीत सुपरिटेंडंट होते. त्यामुळे त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात

हत्ती

कथा : रमेश तांबे एक होता हत्ती त्याच्या अंगात फार मस्ती इकडे तिकडे धावायचा पायाखाली येईल त्याला चिरडायचा. हत्ती