भारताचा जवान करणार अंतराळात उड्डाण! अ‍ॅक्सिओम स्पेस ४ मधून घेणार झेप

राकेश शर्मानंतर अंतराळात उड्डाण करणारे शुभांशू शुक्ला हे भारताचे दुसरे सूपुत्र ठरतील


फ्लोरिडा: भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) इतर तीन साथीदारांसोबत फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून, अक्सिओम-४ (Axiom 4) मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) रवाना होणार आहे.  दि. १० जून रोजी ते मानवी अंतराळ उड्डाणासाठी निघतील आणि सुमारे २८ तासांच्या प्रवासानंतर दि. ११ जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजता अंतराळ स्थानकात पोहोचण्याची अपेक्षा आहे. संपूर्ण, भारतासाठी हा एक अभिमानाचा क्षण म्हणावा लागेल. 


चार दशकांहून अधिक काळानंतर, एक भारतीय अंतराळात जाणार असल्याकारणामुळे, ही अंतराळ मोहीम भारतीयांसाठी खूप मोठी आणि महत्वाची आहे. भारतीय हवाई दलाचे सन्मानित पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला स्पेसएक्सच्या फाल्कन ९ क्रू ड्रॅगनवर मिशन पायलट म्हणून उड्डाण करणार आहेत. ते १० जून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी (ISS) उड्डाण करतील. या खास अंतरिक्ष प्रवासासाठी त्यांना प्रोत्साहन देणारे दुसरे तिसरे कोणी नसून अ‍ॅक्सिओम स्पेसचे मुख्य अंतराळवीर आणि चार अंतराळ उड्डाणांचे अनुभवी मायकल लोपेझ-अ‍ॅलेग्रिया आहेत.


लोपेझ-अ‍ॅलेग्रिया, यांनी शुक्ला यांना पहिल्या अंतरिक्ष उड्डाणासाठी उबदार आणि आत्मविश्वासपूर्ण शुभेच्छा दिल्या, ज्यात ते म्हणाले, "शॅक्स, तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण क्रूला शुभेच्छा. प्रवासाचा आनंद घ्या."



शुभांशू शुक्ला बद्दल काय म्हणाले लोपेझ-अ‍ॅलेग्रिया?


शुभांशू शुक्ला यांनी लोपेझ-अ‍ॅलेग्रियाच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅक्सिओम स्पेसमध्ये जवळजवळ एक वर्ष प्रशिक्षण घेतले आहे, ज्यामध्ये स्ट्रॉंग सिम्युलेशन, आपत्कालीन व्यायाम आणि मिशन रिहर्सलचा समावेश आहे. नासाचे माजी अंतराळवीर लोपेझ-अ‍ॅलेग्रिया यांनी २५७ दिवसांहून अधिक काळ अंतराळात घालवले आहेत.  त्यांच्या तालमीत शुक्ला तयार झाले आहेत.  त्यामुळे शुक्लाबद्दल बोलताना ते म्हणाले, "पहिल्या अंतरिक्ष दौऱ्याचे थोडेसे दडपण त्यांना नक्कीच जाणवेल. वेगाशी जुळवून घेण्यासाठी त्यांना खूप ताण येईल, कारण ते खूप वेगवान आहे, परंतु ते त्यासाठी खूप चांगले प्रशिक्षित असून, ते निश्चितच चांगले काम करतील."



अ‍ॅक्सिओम-४ ची मोहीम भारतासाठी महत्वाची


अ‍ॅक्सिओम-४ मोहीम ही भारताच्या मानवी अंतराळ उड्डाण महत्त्वाकांक्षांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. १९८४ मध्ये सोव्हिएत सोयुझ यानातून अंतराळात जाणारे विंग कमांडर राकेश शर्मा हे पहिले भारतीय ठरले. त्यांनंतर शुक्ला हे दुसरे असतील. त्यांचे हे मिशन आयएसएसला जाणाऱ्या व्यावसायिक क्रू फ्लाइटमध्ये भारताचा पहिला सहभाग आहे. याला भारत सरकारकडून निधी दिला जातो, जो अंतराळात सरकार-समर्थित आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या नवीन युगाचे संकेत देतो.


भारताने अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेसाठी ५४८ कोटी रुपये खर्च केले आहेत. या पैशात शुभांशूचा प्रवास, प्रशिक्षण आणि मोहिमेतील इतर खर्च समाविष्ट आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या महितीनुसार, लोपेझ अलेग्रिया यांना जेव्हा त्यांनी विचारले की शुक्ला हे एक उत्तम अंतराळवीर बनतील का? तेव्हा त्यांनी संकोच न करता "ते उत्तम कामगिरी करतील यात मला काहीच शंका नाही," असे उत्तर दिले.



शुभांशू शुक्लासोबत आणखी कोण जाणार?



मिशन पायलट म्हणून, शुक्ला क्रू ड्रॅगन अंतराळयानावरील महत्त्वाच्या ऑपरेशन्ससाठी जबाबदार असतील आणि आयएसएसवरील वैज्ञानिक प्रयोगांमध्ये मदत करतील. त्यांच्या क्रूमेटमध्ये हंगेरी, पोलंड आणि युनायटेड स्टेट्समधील अंतराळवीरांचा समावेश आहे, ज्यामुळे हे खरोखरच जागतिक मोहीम बनते. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून होणारे हे उड्डाण केवळ भारताच्या अंतराळ समुदायाकडूनच नव्हे तर लाखो भारतीयांकडून देखील पाहिले जाणार आहे. 

Comments
Add Comment

सुशीला कार्की नेपाळच्या नव्या हंगामी पंतप्रधान

नेपाळची संसद बरखास्त, हंगामी सरकारचे नेतृत्व करणार नवी दिल्ली : नेपाळमध्ये मागील काही दिवसांपासून मोठ्या

‘या’ देशातील ९९ टक्के लोक वापरत नाहीत सोशल मीडिया

इंटरनेट सुविधा अत्यंत मर्यादित नैरोबी : आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो, ज्यात सोशल मीडियावर लोक

रशियामध्ये महाभयंकर भूकंप! त्सुनामीचा इशारा जारी

मॉस्को: शनिवारी रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंपाचे धक्के बसले आहेत, ज्याची तीव्रता

काँगोमध्ये बोट उलटल्या, १९३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बहुतेक विद्यार्थी

काँगो: आफ्रिकन देश काँगोमधून एक मोठी बातमी येत आहे. येथील वायव्य इक्वेटूर प्रांतात झालेल्या दोन वेगवेगळ्या बोट

माजी सरन्यायाधीश सुशील कार्की यांच्या हाती नेपाळचे नेतृत्व, राष्ट्रपतींनी दिली शपथ

काठमांडू: नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि 'जनरेशन झेड' (Gen-Z) तरुणाईच्या जोरदार आंदोलनानंतर अखेर

Nepal News : भारतीय पर्यटकांवर नेपाळमध्ये हल्ला; प्रवाशांचे मोबाईल-रोख रक्कम लुटली अन् सर्वांना तातडीनं...

काठमांडू : नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण मिळालंय. गेल्या काही