दुबईत भारतीय अभियंत्याचा मृत्यू

दुबई : बकरी ईद निमित्त असलेल्या सुटीत स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी गेलेल्या भारतीय सिव्हिल इंजिनिअरचा दुबईत जुमेराह बीचवर मृत्यू झाला. जुमेराह येथे समुद्रात स्कुबा डायव्हिंग करताना पाण्याखाली श्वास घेतेवेळी त्रास झाला आणि गुदमरून भारतीय सिव्हिल इंजिनिअर ओलाक्केंगील यांचा मृत्यू झाला. ओलाक्केंगील हे पत्नी रेशम आणि धाकटा भाऊ इविन यांच्यासोबत सुटीचा आनंद घेण्यासाठी जुमेराह येथे समुद्र किनाऱ्यावर गेले होते.

स्कुबा डायव्हिंग करतेवेळी पाण्याखाली श्वास घेताना त्रास झाला आणि हृदयविकाराचा झटका आला. यामुळेच ओलाक्केंगील यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीअंती सांगितले. आयुष्यात पहिल्यांदाच ओलाक्केंगील आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य स्कुबा डायव्हिंग करत होते. पाण्याखाली गेल्यावर ओलाक्केंगील, रेशम, इविन या तिघांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ओलाक्केंगील यांना थोड्याच वेळात हृदयविकाराचा झटका आला. तब्येत ढासळत असल्याचे बघून ओलाक्केंगील यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. थोड्याच वेळात ओलाक्केंगील यांचा मृत्यू झाला. रेशम आणि इविन यांना वाचवण्यात आले. पण इविन यांची तब्येत अद्याप नाजूक आहे. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस तपास करत आहेत. स्कुबा डायव्हिंगच्या सर्व साहित्याची कसून तपासणी सुरू आहे.

ओलाक्केंगील हे मूळचे केरळचे आहेत. यामुळे त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मूळगावी नेण्याचे नियोजन सुरू आहे.
Comments
Add Comment

पाकिस्तानच्या इतिहासात आयएसआय प्रमुखाला पहिल्यांदाच शिक्षा

जनरल फैज हमीद यांना १४ वर्षे तुरुंगवास इस्लामाबाद : भारताविरोधात कटकारस्थाने रचणारी पाकिस्तानची गुप्तचर

फ्रान्समध्ये वीज झाली पूर्ण मोफत

युरोप  : फ्रान्स देशात काही विशिष्ट कालावधीसाठी विजेची किंमत अचानक 'शून्य' झाली आहे. मागणीत मोठी घट आणि उत्पादनात

पाकिस्तानच्या संसदेत सभापतींना रोख रक्कम मिळाली, १२ खासदारांनी १० नोटांसाठी उड्या मारल्या

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत एक अजब घटना घडली. या घटनेवर हसावे की पाकिस्तानच्या खासदारांच्या

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

सिंधुदेशाच्या मागणीवरून वातावरण तापलं, पाकिस्तानची फाळणी होणार ?

इस्लामाबाद : सिंधी संस्कृती दिनाचे औचित्य साधून कराचीमध्ये 'सिंधुदेश'च्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या

कट्टरतेकडे झुकत असलेला बांगलादेश होत आहे कर्जबाजारी

  ढाका : बांगलादेशमध्ये शेख हसिना यांचे बहुमतातले सरकार होते. पण शत्रू देशांच्या मदतीने बांगलादेशमधील