Saturday, October 25, 2025
Happy Diwali

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. आता १० लाख नाही तर २५ लाखांची मदत केली जाणार आहे.

याआधी राज्य सरकारने १० लाख रूपये मदत निधीची घोषणा केली होती मात्र घटनेचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्र्‍यांनी ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेत की मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना तात्काळ मदत केली जावी यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळेल.

११ लोकांचा गेला होता जीव

आरसीबीच्या संघाने १८ वर्षानंतर पहिल्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती. यामुळे या विजयाचे सेलीब्रेशन कऱण्यासाठी स्टेडियममध्ये तुफान गर्दी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सेलिब्रेशनदरम्यान स्टेडियमबाहेर आणि आत अचानक गर्दीवरील नियंत्रण सुटले. यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले होते.

Comments
Add Comment