शब्दावाचुन कळले सारे


शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले


अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन्‌ ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले?


आठवते पुनवेच्या रात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले


गीत : मंगेश पाडगांवकर
स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी





अग्गोबाई ढग्गोबाई



अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ !
थोडी न्‌ थोडकी, लागली फार !
डोंगराच्या डोळ्याला
पाण्याची धार !!


वारा वारा गरागरा
सो सो सूम...
ढोल्या ढोल्या ढगात
ढुम ढुम ढुम...
वीजबाई अशी
काही तोऱ्यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर
चम चम छडी !!


खोल खोल जमिनीचे
उघडून दार
बुड बुड बेडकाची
बडबड फार !
डुंबायला डबक्याचा
करूया तलाव
साबु-बिबु नको...
थोडा चिखल लगाव !!


गीत : संदीप खरे
स्वर : सलील कुलकर्णी, संदीप खरे

Comments
Add Comment

नुसती पूजा नको, सन्मानही हवा

रमा सरोदे, प्रसिद्ध विधिज्ञ नवरात्रीचे दिवस अनेकार्थाने महत्त्वपूर्ण असतात. यामागे पौराणिक कथा आहेत, सामाजिक

संगीताचे सुवर्णयुग अर्थात बाबूजी

मराठी असो किंवा अमराठी प्रत्येक रसिक श्रोत्यांच्या मनामनात भावगीत गायक आणि चित्रपट क्षेत्रातील निर्माते,

जेन झी

शरद कदम नेपाळमध्ये तरुणांनी आंदोलन केले आणि सत्ता बदल झाला. असंख्य तरुण-तरुणी एका मेसेजवर रस्त्यावर उतरले आणि

लोकसंस्कृतीचे वाहक

विशेष : लता गुठे वासुदेव, जोशी, पिंगळा भारतीय समाजजीवनाच्या सांस्कृतिक परंपरेत लोककलेला अत्यंत महत्त्वाचे

“काहेको दुनिया बनाई...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे राज कपूर आणि वहिदा रहमान ही जोडी असलेला ‘तिसरी कसम’ हा १९६६ सालचा चित्रपट.

सिंदुरासूर

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युग सुरू होते. एकदा ब्रह्मदेवांना जांभई आली. तेव्हा त्यांच्या