शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले प्रथम तुला पाहियले आणिक घडू नये ते घडले
अर्थ नवा गीतास मिळाला छंद नवा अन् ताल निराळा त्या दिवशी का प्रथमच माझे सूर सांग अवघडले?
आठवते पुनवेच्या रात्री लक्ष दीप विरघळले गात्री मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले
गीत : मंगेश पाडगांवकर स्वर : पं. जितेंद्र अभिषेकी
अग्गोबाई ढग्गोबाई
अग्गोबाई ऽऽ ढग्गोबाई ऽऽ लागली कळ ढगाला उन्हाची केवढी झळ ! थोडी न् थोडकी, लागली फार ! डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार !!
वारा वारा गरागरा सो सो सूम... ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम... वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी आकाशाच्या पाठीवर चम चम छडी !!
खोल खोल जमिनीचे उघडून दार बुड बुड बेडकाची बडबड फार ! डुंबायला डबक्याचा करूया तलाव साबु-बिबु नको... थोडा चिखल लगाव !!
गीत : संदीप खरे स्वर : सलील कुलकर्णी, संदीप खरे