लखनऊ : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा आज म्हणजेच रविवार ८ जून २०२५ रोजी होणार आहे. हा साखरपुडा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे होणार आहे. लखनऊच्या द सेंट्रम या पंचतारांकीत हॉटेलच्या भव्य सभागृहात (हॉल) क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखपुडा होणार आहे. या समारंभाला अनेक व्हीआयपी उपस्थित असतील.
समारंभासाठी सभागृह फुल आणि रंगीत फुग्यांनी सजविण्याचे काम सुरू आहे. खुर्च्या पांढरे मुलायम कापड आणि पिवळ्या रंगाच्या रिबिनद्वारे सजविण्यात आल्या आहेत. स्टेज तयार करण्याचे काम पण सुरू आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत स्टेजवर होणार असलेल्या समारंभात भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज हे दोघे एकमेकांना अंगठी घालतील. साखपुड्यासाठी राजकारणी, क्रिकेटपटू असे ३०० मान्यवर उपस्थित असतील.
आयपीएल सुरू असताना लखनऊमध्ये खेळण्यासाठी आलेल्या क्रिकेटपटूंचा मुक्काम द सेंट्रम या पंचतारांकीत हॉटेलमध्येच होता. आयपीएल संपल्यावर कुलदीप यादवचा साखरपुडाही द सेंट्रम या पंचतारांकीत हॉटेलमध्ये झाला. आता भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाची खासदार प्रिया सरोज यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने हॉटेलचा स्टाफ मान्यवरांचा पाहुणचार करणार आहे. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचे लग्न याच वर्षी १८ नोव्हेंबर रोजी वाराणसी येथे होणार आहे.