Friday, October 24, 2025
Happy Diwali

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद
पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल उभारण्यात येत आहे. या पुलासाठी भिडे पूल आणखी दीड महिना बंद ठेवला जाणार आहे. महामेट्रोने मार्च महिन्यात या पुलाचे काम सुरू केले होते, तर दि. ६ जूनपर्यंत ते पूर्ण करून भिडेपूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता. मात्र, प्रत्यक्षात या पादचारी पुलाचे काम केवळ २० टक्केच पूर्ण झाल्याने महामेट्रोने १५ ऑगस्टपर्यंत पूल बंद ठेवण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच महापालिकेकडे केली आहे. शहराच्या पश्चिम उपनगरांमधील बहुतांश दुचाकी वाहतूक नदीपात्रातील रस्त्यावरून भिडे पुलावरून शहराच्या मध्यवर्ती पेठांमध्ये येते. दररोज सुमारे अडीच ते तीन लाख दुचाकींची या रस्त्यावर वर्दळ असते. पावसाळ्यात केवळ मुठा नदीला पाणी सोडण्यात आल्यानंतरच हा रस्ता बंद केला जातो. मात्र, आता मेट्रोच्या पादचारी पुलासाठी भिडेपूल बंद करण्यात आला आहे. या रस्त्यावरून येणारी दुचाकी वाहनांची वाहतूक डेक्कनवरून लकडी पुलामार्गे शहरात वळवण्यात आली आहे. तर, नदीपात्रात जाण्यासाठी अनेक वाहनचालक झेड ब्रीजचा वापरहोत आहे. मात्र, हे रस्ते मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दुचाकींसाठी कमी पडत असल्याने, या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >