Marathi Movie: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं पोस्टर रिलीज

Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचा पहिला लूक (फर्स्ट लूक) समोर आला आहे. राज्याभिषेक दिनाच्या पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी हा लूक प्रदर्शित करून या चित्रपटाच्या टीमने एकप्रकारे शिवराज्याभिषेकाला आधुनिक अभिवादनच केले आहे.

सिद्धार्थ बोडके यांनी साकारलेला शिवाजी महाराजांचा राजस आणि तेजस्वी लूक पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. घोड्यावर विराजमान, डोक्यावर साजिरे जिरेटोप,  डोळ्यांत विजेसारखी चमक आणि शिवरायांची तेजस्वी देहबोली या लूकमध्ये सिद्धार्थ अत्यंत आत्मविश्वासाने महाराजांचा प्रभावी दरारा प्रेक्षकांसमोर उभा करत आहे.

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुभवी महेश वामन मांजरेकर यांनी केले असून, चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. तर संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे.
Comments
Add Comment

सुपरस्टार अक्षय कुमारची संपत्ती किती ?

मुंबई : बॉलीवूड हे स्वप्नांचे शहर आहे, जिथे मेहनत, चिकाटी आणि अभिनयाच्या जोरावर सामान्य माणूसही सुपरस्टार बनू

अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री प्रिया मराठेचे कर्करोगामुळे ३८ व्या वर्षी निधन झाले. कर्करोगाचे निदान

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाहच्या आयुष्यात झाली 'ती'ची एन्ट्री

मुंबई : गणेशोत्सव सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, जल्लोषाचे वातावरण दिसत आहे. अनेकांनी त्यांच्या नव्या

‘जॉली एलएलबी ३’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटाचा वाद वाढतच चालला आहे. जॉली एलएलबी

गणरायाच्या आगमनाचा ‘कुली’ चित्रपटाला फायदा

सध्या बॉक्स ऑफिसवर फक्त तीन चित्रपट उत्तम कमाई करत आहेत. एकीकडे ‘कुली’ आणि ‘वॉर २’ हे दोन मोठे चित्रपट चांगली

पार्थ पवार-जॅकलिन जोडीने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबईत ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक सेलिब्रिटींनी विविध