Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Marathi Movie: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं पोस्टर रिलीज

Marathi Movie: 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाचं पोस्टर रिलीज
Marathi Movie: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त, महेश मांजरेकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ या चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचा पहिला लूक (फर्स्ट लूक) समोर आला आहे. राज्याभिषेक दिनाच्या पवित्र आणि ऐतिहासिक दिवशी हा लूक प्रदर्शित करून या चित्रपटाच्या टीमने एकप्रकारे शिवराज्याभिषेकाला आधुनिक अभिवादनच केले आहे. सिद्धार्थ बोडके यांनी साकारलेला शिवाजी महाराजांचा राजस आणि तेजस्वी लूक पाहून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. घोड्यावर विराजमान, डोक्यावर साजिरे जिरेटोप,  डोळ्यांत विजेसारखी चमक आणि शिवरायांची तेजस्वी देहबोली या लूकमध्ये सिद्धार्थ अत्यंत आत्मविश्वासाने महाराजांचा प्रभावी दरारा प्रेक्षकांसमोर उभा करत आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अनुभवी महेश वामन मांजरेकर यांनी केले असून, चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी सांभाळली आहे. तर संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >