महालक्ष्मी रेसकोर्सवर 'इव्हेंट जॅकपॉट' महापालिकेने कमावले तब्बल ७.५ कोटी!

मुंबई : मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर बीएमसीने कमाईची 'रेस' लावली आहे. जुलै २०२४ पासून मुंबई महापालिकेने ताब्यात घेतलेल्या १२० एकर जमिनीवर इव्हेंट भाडे देऊन तब्बल ७.५ कोटींचा महसूल जमा केला आहे.


या जागेवर मागील वर्षभरात Lollapalooza India, Guns N' Roses चा रॉक शो आणि आंतरराष्ट्रीय अश्वशर्यती यांसारखे भव्य इव्हेंट्स पार पडले. बीएमसीच्या भाडे धोरणानुसार, तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी बेस रेट ५० लाख असून, प्रत्येक अतिरिक्त दिवसासाठी १२.५ लाख आकारले जातात.



या संपूर्ण २१२.७ एकर रेसकोर्सपैकी १२०.१ एकर जमीन बीएमसीकडे आहे, तर उर्वरित ९२.६ एकर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला २०५३ पर्यंत भाडेपट्ट्याने दिली आहे. ही जमीन ‘न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क’च्या धर्तीवर जागतिक दर्जाच्या सार्वजनिक उद्यानात रूपांतरित करण्याची योजना आहे.


हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सायकल ट्रॅक, वॉकवे, ग्रीन झोन आणि इव्हेंट सादरीकरणासाठी विशेष मोकळी जागा असा हायब्रिड डिझाइन प्लॅन तयार केला जात आहे.


विशेष म्हणजे, या विकासासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ला काम सोपवण्याची शक्यता असून, बीएमसीकडून यावर कोणताही खर्च केला जाणार नाही. तसंच, कोस्टल रोड आणि रेसकोर्सच्या मोकळ्या जागा पादचारी सबवेने जोडण्याचं नियोजनही अंतिम टप्प्यात आहे.


मुंबईत मोकळ्या जागेच्या टंचाईत बीएमसीचा हा उपक्रम म्हणजे कमाई आणि सुविधा दोन्ही साधणारा यशस्वी फॉर्म्युला ठरत आहे.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी