Monday, October 27, 2025
Happy Diwali

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

प्रसाद ओक यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान जाहीर

पुणे : निळू फुले यांचे कुटुंबीय व बेलवलकर सांस्कृतिक मंच यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असल्याची माहिती बेलवलकर सांस्कृतिक मंचाचे समीर बेलवलकर यांनी कळविली आहे. शनिवार, दिनांक ७ जून रोजी मयूर कॉलनी, कोथरूड येथील बालशिक्षण प्रशालेच्या एमईएस सभागृहात संध्याकाळी ५ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्काराचे मागील वर्षीचे सन्मानार्थी अभिनेता सुमीत राघवन आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते सदर पुरस्कार ओक यांचा प्रदान करण्यात येईल.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल. कार्यक्रमस्थळी काही जागा या निमंत्रितांसाठी राखीव असतील, याची कृपया नोंद घ्यावी. यंदा या सन्मान सोहळ्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे. रोख रुपये २१ हजार, मानचिन्ह, गांधी टोपी आणि उपरणे असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा