Lavani Gaurav Awards 2025: पडद्यामागील कलाकारांचा होणार सन्मान, यंदाचे लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

  83

मुंबई: लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा ११ वा वर्धापनदिन आणि पुरस्कार सोहळा २०२५ मंगळवार, दिनांक २४ जून, २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर सोहळ्यात सालाबादाप्रमाणे याही वर्षी लावणी आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक मान्यवर कलावंतांना लावणी गौरव आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्कार

या प्रसंगी शाहीरी परंपरेतील जेष्ठ शाहीर मधुकर खामकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहेत, तर लावण्यवती प्रज्ञा कोळी, शाहीर दत्ताराम म्हात्रे, गायिका वंदना निकाळे, पुरुष लावणी कलाकार आनंद साटम, निर्माते उदय साटम, वादक धीरज गोरेगांवकर, नृत्यदिग्दर्शक सुभाष नकाशे, निवेदक भरत उतेकर, लोककलेसाठी सुनिल ढगे, नेपथ्य तंत्रज्ञ म्हणून सुनील देवळेकर या कलाकारांना लावणी गौरव २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. किरण डांगे आणि सुजाता कांबळे-डांगे या कलाकार दांपत्याचा राजाराणी - २०२५ या पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे. तसेच सदर सोहळ्यात कलाकारांच्या इयत्ता दहावी बारावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. सोबत महासंघाच्यावतीने आयोजित नवरात्र सोहळ्यातील नवरंग स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात येणार आहे. सदर सोहळ्यात मुंबईतील नामवंत कलाकारांच्यावतीने दिमाखदार नृत्यविष्कारासह सांगितिक कार्यक्रम सुद्धा सादर होणार आहे, असे अध्यक्षा कविता घडशी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Kangana Ranaut : "बाप रे, एकाच खोलीत पाचवेळा… कंगनाचा थरारक खुलासा ऐकून अंगावर शहारे येतील!" नेमकं काय घडलं त्यावेळी?

बॉलिवूडची ‘क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी कंगना राणौत केवळ तिच्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर स्पष्टवक्तेपणा आणि

शमिता शेट्टीने केला राष्ट्रगीताचा अपमान? व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

मुंबई: आज संपूर्ण देशात ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहेत. या खास प्रसंगी भारतात प्रत्येक ठिकाणी १५ ऑगस्ट

रहस्यमय ‘घबाडकुंड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, भव्य-दिव्य सेटवर होणार चित्रीकरण

मुंबई: प्रत्येकालाच आयुष्यात एकदा तरी 'घबाड' मिळावं आणि रातोरात श्रीमंत व्हावं असं वाटतं. अशाच एका घबाडाच्या

गायकाने तब्बल २० वर्षांनी केले हे खास काम, म्हणाला 'आयुष्यातील मोठी संधी...

मुंबई : 'इंडियन आयडल'च्या पहिल्या पर्वाचा विजेता आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा गायक अभिजीत सावंत

इंद्रायणी मालिकेत अंधश्रद्धेविरुद्ध शिक्षणाची लढाई!

मुंबई: लोकप्रिय मालिका 'इंद्रायणी' मध्ये लवकरच एक मोठा संघर्ष पाहायला मिळणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त

आई तुळजाभवानी मालिकेत महादेवाकडून जगदंबेला योगविद्येचं ज्ञान!

मुंबई: लोकप्रिय मालिका "आई तुळजाभवानी" मध्ये लवकरच एक रोमांचक आणि आध्यात्मिक अध्याय सुरू होणार आहे. या विशेष