Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

  64

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट प्रकाराच्या सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १६३ रुपयाने घसरण होत किंमत ९७९७ रूपयांवर व प्रति तोळा किंमत ९७९७ रूपयांवर पोहोचली आहे. २२ कॅरेट प्रकाराच्या सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम किंमत ८९८० रूपयांवर व प्रति तोळा किंमत ९७९७० रूपयांवर पोहोचली आहे. १८ कॅरेट प्रति ग्रॅम किंमत ७३४८ रूपयांवर व प्रति तोळा किंमत ७३४८० रुपयांवर पोहोचली.

चांदीच्या दरात कालही वाढ झाल्यानंतर आज चांदीत आज स्तब्धता आली आहे. आज चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. महत्वाच्या प्रमुख शहरांत चांदीचा दर प्रति किलो १०७००० रूपये कायम आहे व प्रति ग्रॅम किंमत १०७ रूपये आहे.

एमसीएक्स (Multi Commodity Exchange) वरील सोने निर्देशांक ०.०२ टक्क्याने वाढला असून चांदीच्या निर्देशांकात ०.०५ टक्क्याने वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर ९७०५१.०० पातळीवर व चांदीचा दर १०५५२५.०० पातळीवर पोहोचला आहे. युएस गोल्ड स्पॉट दरात (US Gold Spot Rate) १.३१% घसरून ३३१०.१७ पातळीवर पोहोचला. तर गोल्ड फ्युचर निर्देशांक (Gold Future) ०.७४ टक्क्याने घसरून ३३४६.६० पातळीवर पोहोचला.

अमेरिकन बाजारात पेरोल डेटा येणे अपेक्षित आहे. यापूर्वी अमेरिकन अर्थव्यवस्थेत ढासळलेली पातळी पाहता डॉलरप्रमाणे सोन्याच्या दरातही घट झाली आहे. अमेरिकेने चीनबरोबर संवाद चालू केला असली तरी चित्र अजून स्पष्ट नाही या पार्श्वभूमीवर आज दरात घसरण झाली. रेपो दरात ०.५० टक्क्याने झालेली कपात देखील सोने दरात घट होण्यास कारणीभूत ठरली आहे.
Comments
Add Comment

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन

प्रतिष्ठित लता मंगेशकर पुरस्कारांसह ६० आणि ६१ वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात येणार मुंबई :

Monsoon Disease: मुंबईकरांनो सावधान! शहरात ‘या’ ३ रोगांचा कहर

मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्णसंख्या वाढल्याने महानगरपालिका सतर्क मुंबई:  शहरात गेली अनेक

मिठीचा गाळ, गोतास काळ; ७,००० पानांचे आरोपपत्र, मोठे मासे सापडणार!

मुंबई पोलिसांकडून मिठी नदी गाळ काढणी घोटाळा उघड ६५.५४ कोटींचा धक्कादायक प्रकार! मुंबई : ६५.५४ कोटींच्या मिठी

सांगा चूक कोणाची? लपवाछपवी कोणासाठी? बीएमसी आणि म्हाडामध्ये घमासान!

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) यांच्यात चांदिवलीतील

वसई विरार मनपाच्या माजी आयुक्तांनंतर आणखी एका बड्या अधिकाऱ्यावर ED ची धाड

मुंबई : वसई विरारचे महापालिकेचे महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार यांच्यावर ED नं काही दिवसांपूर्वीच धाड टाकली

हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी बनवले फेक इन्स्टाग्राम अकाउंट

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात एप्रिल महिन्यात एका वीस वर्षीय तरुणाने एका व्यक्तीला धारदार हत्याराने वार करत