French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इटलीच्या जॅनिक सिन्नरने फ्रेंच ओपन २०२५ मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात जॅनिक सिन्नरने नोवाक जोकोविचचा ६-४, ७-५, ७-६ (३) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. रोलँड गॅरोसच्या फिलिप चॅटियर कोर्टवर खेळल्या गेलेल्या सामन्यात जॅनिक सिन्नरने नोवाक जोकोविचचा पराभव केला. सिन्नरने सहाव्या मानांकित जोकोविचविरुद्धचा सामना तीन तास सोळा मिनिटांत जिंकला. सिन्नर सलग तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅमचा अंतिम सामना खेळणार आहे.

जॅनिक सिन्नर २३ वर्षांचा आहे. हा तरुण गुणी टेनिसपटू रविवार ८ जून २०२५ रोजी अंतिम सामन्यात स्पेनचा जागतिक क्रमांक दुसऱ्या स्थानी असलेल्या कार्लोस अल्काराझ विरोधात खेळणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीने कार्लोस अल्काराझविरुद्धचा सामना अर्ध्यावर सोडला. आठव्या मानांकित मुसेट्टीने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा अल्काराझ ४-६, ७-६ (३), ६-०, २-० ने आघाडीवर होता.

जॅनिक सिन्नर पहिल्यांदाच फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. गेल्या वर्षी त्याला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. सिन्नरच्या नावावर आतापर्यंत तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे आहेत. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन दोनदा (२०२४, २०२५) आणि यूएस ओपन (२०२४) एकदा जिंकले. दुसरीकडे, जर अल्काराजने अंतिम फेरी जिंकली तर ते त्याचे दुसरे फ्रेंच ओपन आणि एकूण पाचवे ग्रँड स्लॅम जेतेपद असेल. अल्काराज या २२ वर्षांच्या खेळाडूने आतापर्यंत दोन विम्बल्डन (२०२३, २०२४), एक फ्रेंच ओपन (२०२४) आणि एक यूएस ओपन (२०२२) जेतेपदे जिंकली आहेत.
Comments
Add Comment

Jaiswal, Fernando : आयसीसीची यशस्वी जैस्वाल आणि असिथा फर्नांडोवर दंडात्मक कारवाई

कोलंबो : दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर झालेल्या झटापटीनंतर भारतीय सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि

INDvsSL : श्रीलंकेविरुद्धच्या कोलंबो कसोटीवर भारताची मजबूत पकड

कोलंबो : भारताने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आपले स्थान मजबूत केले आहे. देवदत्त पडिक्कलच्या शतकानंतर

Durand Cup 2026 Final : २२ वर्षांची प्रतीक्षा संपवत ईस्ट बंगाल ठरला चॅम्पियन; मोहन बागानचा ४-१ असा धुव्वा!

कोलकत्ता : भारतीय फुटबॉल वर्तुळातून एक अतिशय रोमांचक आणि मोठी बातमी समोर आली आहे. कोलंबो येथील सिंहलीज क्रिकेट

IND vs SL Colombo Test : कोलंबो कसोटीमध्ये पावसाचा व्यत्यय, भारताने उभारला धावांचा डोंगर; ध्रुव जुरेल शतकाच्या उंबरठ्यावर

https://prahaar.in/2026/08/24/if-i-get-a-chance-i-will-contest-elections-olympic-medalist-saina-nehwal-said/ श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या सत्रात मुसळधार

Saina Nehwal : 'मौका मिला तो चुनाव लड़ूंगी', ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवालची मोठी घोषणा!

ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली बॅडमिंटनपटू सायना नेहवालने निवडणूक

Ind vs SL 2nd Test Rishabh Pant : ऋषभ पंतचा ऐतिहासिक पराक्रम; दुखापतीनंतर मैदानात परतत धोनीचा विक्रम मोडला!

Colombo : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या खेळाच्या जोरावर इतिहास रचला